पणजी : गोव्याच्या प्रसिध्द दुधसागर धबधब्यावर प्रवेश नाकारलल्याने रविवारी सकाळी हजारो पर्यटक अडकले. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीबरोबर संतापाचे वातावरण पसरले.
अलीकडेच सांगेतील मैनापी धबधब्यावर दोघांचा मृत्यू झाल्यानंतर वन खात्याने अभयारण्ये तसेच वन क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास बंद घातली आहे. बंदीची माहिती शेजारी कर्नाटक, महाराष्ट्रातील पर्यटकांना नसावी. यशवंतपूर (बंगळूरु)-वास्को तसेच निझामुद्दीन एक्सप्रेस रेलगाड्यांमधून रविवारी सकाळी हजारो पर्यटक दुधसागरला भेट देण्यासाठी रेल्वे स्थानकात उतरले तेव्हा वन अधिकाय्रांनी तेथेच त्यांना अडवले.
पावसाळ्यात दुधसागर धबधब्यावर विहंगम दृष्य असते. लाखो पर्यटक पावसात या धबधब्याला भेट देत असतात परंतु गोव्यात सलग कोसळत असलेल्या पावसामुळे धभधबे धोकादायक बनले आहेत. राज्यात हरवळे तसेच अन्य ठिकाणीही धबधबे आहेत. परंतु दुधसागरला पर्यटकांची विशेष पसंती असते.