हॉस्पिटलमधूनच मनोहर पर्रीकरांच्या फोनवरुन धमक्या, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 07:34 PM2018-09-21T19:34:44+5:302018-09-21T20:09:36+5:30

पर्रीकर आजारी असले तरी इस्पिळाच्या खोलीतून लोकांना फोन लावतात आणि धमक्या देतात,

Threats from Manohar Parrikar's phone call from the hospital Blame Congress leader | हॉस्पिटलमधूनच मनोहर पर्रीकरांच्या फोनवरुन धमक्या, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

हॉस्पिटलमधूनच मनोहर पर्रीकरांच्या फोनवरुन धमक्या, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Next

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेताना वेळ मिळतो तेव्हा सरकारी फाइल्सही हातावेगळ्या करण्याचे काम करतात, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तर, काँग्रेसचेगोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी पर्रीकर हे इस्पितळातून फोनवरुन लोकांना धमक्या देत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

पर्रीकर आजारी असले तरी इस्पिळाच्या खोलीतून लोकांना फोन लावतात आणि धमक्या देतात, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे, असा दावा चेल्लाकुमार यांनी केला. लोकायुक्तांसमोर सुनावणीस असलेल्या 1 कोटी 44 लाख रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणात दोषी आढळल्यास मालमत्ता सरकारजमा करीन, असे आश्वासन पर्रीकर यांनी जनतेला द्यावे, अशी मागणीही चेल्लाकुमार यांनी केली. आजपावेतो पर्रीकरांनी माजी मंत्र्यांवर कारवाई केली, पण आता पाळी पर्रीकर यांची आहे, असे ते म्हणाले. पर्रीकर यांना नेमका कुठला आजार आहे याविषयीची माहिती जनतेसाठी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी विचारले असता, ‘काँग्रेसला काही करायची गरज नाही. पर्रीकर सरकार आपोआप कोसळेल’, असे चेल्लाकुमार म्हणाले. काँग्रेस निश्चितच सरकार स्थापन करील, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. तर राज्यातील आघाडी सरकार मतदारांच्या भावना, तत्त्वे पायदळी तुडवून सत्तेवर आले आहे, असेही ते म्हणाले. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस गोवा फॉरवर्ड किंवा मगोप अथवा अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहे का, या प्रश्नावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. काँग्रेसचे दोन आमदार विदेश दौऱ्यावर गेले असले तरी पक्षाचे सर्व आमदार एकसंध आहेत, असा दावा त्यांनी केला. पक्षाच्या पूर्व परवानगीनेच ते गेलेले आहेत आणि पक्षाला गरज पडेल तेव्हा तात्काळ परत येतील, असे चेल्लाकुमार एका प्रश्नावर म्हणाले. भाजपचे काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा पुनरुच्चार चेल्लाकुमार यांनी केला.

काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाबद्दल कोणतीही समस्या नाही. वेळ येईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करु, असेही त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. काँग्रेसला नेता सापडत नसल्याची टीका करणाऱ्या भाजपने पर्रीकर वगळता त्यांच्याकडे अन्य नेताच नाही का? याचे आधी उत्तर द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच पारदर्शकतेबद्दल बोलतात परंतु येथे तर पर्रीकर यांच्या आजाराबद्दल लपवाछपवी चालली आहे, असे चेल्लाकुमार म्हणाले. दरम्यान, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाही गोवा फॉरवर्डचे मंत्री जयेश साळगांवकर हे सहकुटुंब मुंबईला ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेले आहेत. 
 

Web Title: Threats from Manohar Parrikar's phone call from the hospital Blame Congress leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.