शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

तीन महिन्यांपुर्वी झाली मडगावच्या दामोदर सालात चोरी, अखेर लागला छडा

By सूरज.नाईकपवार | Published: May 20, 2024 4:39 PM

तीन महिन्यांपुर्वी मडगावच्या दामोदर सालातील झालेल्या चोरीप्रकरणांचा शेवटी छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे.

मडगाव: तीन महिन्यांपुर्वी मडगावच्या दामोदर सालातील झालेल्या चोरीप्रकरणांचा शेवटी छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणात पोलिसांनी विकास वसंत नाईक शिरोडकर याला अटक केली आहे. तो शिरोडा येथील रहिवाशी आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. तसेच चोरीला गेलेल्या अलंकाराबाबातही माहिती जाणून घेत आहेत. पोलीस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक पुढील तपास करीत आहेत.

या वर्षी ११ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळया शहरातील आबाद फारिया मार्गावरील दामोदर सालात चोरीची वरील घटना घडली होती. सुशांत सिनारी यांनी नंतर या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भादंसंच्या ४५४ व ३८० कलामाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.तक्रारदाराने तक्रारीत दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञातानो देवालयात शिरुन मुर्तीवरील सोनसाखळी व सोन्याचे पॅडण्ट चोरुन नेल्याचे नमूद केले होते. या ऐवजांची किमंत १ लाख रुपये इतकी आहे. अटक केलेल्या विकास याचा अन्य ठिकाणच्या चोरीतही सहभाग असावा असा पोलिसांना कयास आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी