कुंकळ्ळी : समुद्र खवळलेला असतानाही रशियन पर्यटकांना घेऊन जलसफर करणारी एक मोटरबोट मंगळवारी सकाळी खणगिणी समुद्रात उलटल्याने निकोला इव्हा तातातिना (वय ६६), बुलास्तोव्हा आयरिना (वय ६५), आलेना कुहिकोवा (वय ४३) या महिलांना जलसमाधी मिळाली. स्थानिक जीवरक्षकांनी इतर ११ पर्यटकांसह ३ बोटचालकांचे जीव वाचविण्यात यश मिळविले. मंगळवारी सकाळी ९.३0 वाजण्याच्या सुमारास मोबोर जेटीवरून रशियन पर्यटकांना घेऊन केवीन आगियार यांच्या मालकीची वॉटर स्पोटर््स बोट साळ नदी पार करून समुद्र सफरीला गेली होती. ११.३० वाजण्याच्या सुमारास ही बोट झोरीर खणगिणी समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचली असता ही दुर्घटना घडली. यात तीन रशियन महिला बुडाल्या. दोघीजणी बेतालभाटी येथील हॉटेलात उतरल्या होत्या, तर एकटी मडगाव कदंब बसस्थानकाजवळ हॉटेलात उतरली होती, अशी माहिती मिळाली आहे. समुद्र खवळल्यामुळे बोटचालकाने बोट किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाटांच्या प्रवाहामुळे बोट पर्यटकांसह उलटली. सगळे पर्यटक व बोटीवर असलेले कर्मचारी समुद्रात फेकले गेले. (पान २ वर)
तीन रशियन महिलांचा समुद्रात बुडून मृत्यू
By admin | Published: October 29, 2014 1:06 AM