शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

कोट्यवधींची बिले थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 2:09 AM

पणजी बांधकाम खात्यात कंत्राटदारांची बिले थकण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून आर्थिक चणचणीमुळे सरकारला ही बिले फेडता

पणजी बांधकाम खात्यात कंत्राटदारांची बिले थकण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून आर्थिक चणचणीमुळे सरकारला ही बिले फेडता आलेली नाहीत. ही माहिती आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून पुढे आली आहे. सुमारे १५0 कोटींहून अधिक रकमेची बिले थकल्याची माहिती मिळते. एका प्रकरणात तर पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रार पोचल्यानंतर तेथून राज्याच्या मुख्य सचिवांना योग्य त्या कारवाईचे निर्देश देणारे पत्रही आले आहे. पर्वरीतील बांधकाम विभाग-१७ कडून आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून बिले पडून राहण्याचे कारण निधीचा अभाव हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक वर्षाहून अधिक काळ पडून असलेल्या बिलांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आरटीआय अर्ज केले असता केवळ पर्वरीच्याच या विभागातून तब्बल ३४ लाख रुपयांची बिले थकल्याचे आढळून आले. बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता या बाबतीत कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. काही बिले थकलेली आहेत यास मात्र दुजोरा देण्यात आला. रस्ते बांधकाम, हॉटमिक्स डांबरीकरण, पाण्यासाठी पाईपलाईन टाकणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे आदी कामांसाठी निविदा काढून वर्क आॅर्डर दिली जाते; मात्र बिले फेडण्याच्या बाबतीत सरकारकडून विलंब होतो. अशा प्रकारांमुळे याआधी कंत्राटदाराकडून आत्महत्येचाही प्रकार घडला आहे.