पणजी : सर्पमित्र अमृतसिंह यांच्यावर चोर्ला घाटात झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ प्राणिमित्र तसेच पर्यावरणप्रेमी एकवटले असून बुधवार, ॅदि. २५ रोजी राजधानीत मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन केले आहे. पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात येणार असून, या भ्याड हल्ल्याच्या निषेधात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना गोरक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी पोलीस आणि सरकारच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढले. हल्ला होऊन अकरा दिवस लोटले तरी हल्लेखोर मोकाट आहेत. पोलिसांना हल्लेखोरांविषयी माहिती देऊनही कारवाई होत नाही, असा आरोप त्यांनी केला. हल्ला झाला त्याच्या दोन दिवस आधी कर्नाटकहून बेकायदेशीररीत्या आणले जाणारे गोमांस अमृतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून दिले होते. रात्रीच्यावेळी गोमांस (बीफ) घेऊन येणाऱ्या गाड्या पकडून दिल्या तेव्हा मडगाव येथून सुमारे १५ खाटिक त्या ठिकाणी आले होते. हे बीफ कर्नाटकातील एका कत्तलखान्यातून आणले असल्याचा दावा खाटिकांनी केला, तेव्हा खातरजमा करण्यासाठी आम्ही तेथे गेलो तर सर्व व्यवहार बेकायदा असल्याचे आढळून आले. त्यानंतर कर्नाटकातच पोलीस स्थानकात लेखी तक्रार देण्यात आली. विशेष म्हणजे तक्रार दिल्यानंतर काही वेळातच त्याविषयीची माहिती खाटिकांना मिळाली आणि त्यांनी चोर्ला घाटात आमचा रस्ता अडवून हल्ला केला, असे परब म्हणाले. गोमांसाचा व्यवहार करणाऱ्या माफियांचा पर्दाफाश करू, असा इशारा त्यांनी दिला. अमृतसिंह यांना न्याय देण्यासाठी नव्यानेच स्थापन झालेल्या प्राणिमित्र मंचमध्ये कमलेश बांदेकर, हृदयनाथ शिरोडकर, आंजेला काझी, हितेंद्र भट, चंद्रकांत शिंदे आदींचा समावेश आहे. हे सर्वजण पत्रकार परिषदेस उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी दि. २४ रोजी दु. ३.३0 वाजता प्राणिमित्र वाळपई येथे मोर्चा काढणार आहेत. (प्रतिनिधी)र्
प्राणिमित्रांचा उद्या पणजीत मोचा
By admin | Published: February 24, 2015 3:04 AM