शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

पर्यटन शाश्वत विकास, पायाभूत सुविधा; सुधारणा, ऑफ-बीट गंतव्यस्थानांचा शोध

By किशोर कुबल | Published: November 07, 2023 1:51 PM

गोव्याच्या पर्यटनाचा नवा अध्याय, होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरण

किशोर कुबल, पणजी: गोव्याच्या पर्यटन खात्याने यंदाच्या पर्यटन हंगामासाठी आपल्या रोडमॅपचे अनावरण करताना शाश्वत विकास, पायाभूत सुविधा सुधारणे आणि ऑफबीट गंतव्यस्थानांचा शोध याला प्राधान्य दिले आहे. पर्यटनमंत्र्यांच्या कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार ‘ट्रॅव्हल फॉर लाइफ’ संकल्पनेद्वारे, गोव्याकडे प्रवासी आणि पर्यटकांचे अधिक लक्ष वेधले जाते. ज्यामुळे निवास, वाहतूक आणि इतर पर्यटन-संबंधित सेवांची मागणी वाढते. पर्यटनातील या वाढीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. विशेषत: आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रात, अशा प्रकारे स्थानिक लोकांसाठी रोजगार उपलब्ध होतो. यामध्ये गोव्यातील समुद्रकिनारे, नद्या आणि जंगले यांचे संवर्धन करण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्याद्वारे एकूणच पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावणे समाविष्ट आहे.

गोव्याचे आकर्षक समुद्रकिनारे लाखो पर्यटकांना वर्षभर आकर्षित करतात. गोव्याचे किनारे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी नेहमीच हॉट स्पॉट राहिले आहेत आणि म्हणूनच त्यांना सर्वोत्कृष्ट समुद्रकिनारे आणि किनारी गंतव्यस्थानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत.होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरण अलीकडेच जाहीर करण्यात आलेले नाविन्यपूर्ण होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरण पर्यटकांना अस्सल सांस्कृतिक अनुभव प्रदान करून किनार्‍यांच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करते.गोव्याने ओमानशी मजबूत हवाई संपर्क कायम ठेवला आहे. ओमान एअर आणि भारतीय वाहकांकडून सुमारे ३०० थेट उड्डाणे चालवली जातात. गल्फ एअर आणि भारतीय वाहकांकडून चालवल्या जाणार्‍या चार साप्ताहिक उड्डाणांसा बहरीनमध्येही अशीच सुविधा आहे.

युरोपियन राष्ट्रे तसेच ओमान आणि संयुक्त अरब अमिरात सारखी राष्ट्रे, गोवा विमानतळावर आल्यावर भारतासाठी ई-व्हिसासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पर्यटन मंत्र्यांच्या कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार लंडन आणि युरोपियन बाजारपेठांना गोव्याकडून प्राधान्य दिले जात आहे. पर्यटकांना जागतिक दर्जाचे आदरातिथ्य, सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापांच्या विस्तृत श्रेणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला जातो. ‘वर्क अँट युअर लीजर’ हे एक नवीन आणि जबरदस्त आव्हान आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांप्रती भारताच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे भान ठेवून, पर्यटनाच्या दिशेने नवीन दृष्टीकोन, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण आणि सांस्कृतिकदृष्ट्या शाश्वत पद्धतींवर पर्यटन खात्याने लक्ष केंद्रित केले आहे.

दक्षिण गोव्यात हॉट एअर बलूनिंग आणि उत्तरेत हॉप ऑन हॉप ऑफ बस सेवा यासारख्या अद्वितीय साहसी सेवा दिली जात आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि पदभ्रमण मोहीम राबवत आहे. गोवा हे विवाह सोहळ्यांचे आकर्षण केंद्र बनले आहे. उत्कृष्ट हवाई, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी, हॉटेल्स, पाककृती आणि मनोरंजनाची विस्तृत श्रेणी, गोव्यातील वेडिंग टुरिझमने मोठ्या प्रमाणावर जोर धरला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते.  समुद्रकिनाऱ्यांवर ६७६  जीवरक्षकांची गस्त असते आणि अतिरिक्त कर्मचारी मध्यरात्रीपर्यंत समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालतात. राज्य महिला पर्यटकांसाठी विशेष महिला टॅक्सी सेवा देखील देते. नॅशनल जिओग्राफिकने गोव्याला जगातील टॉप १० सर्वोत्तम नाइटलाइफ शहरांपैकी एक म्हणून गोव्याची निवड केली आहे.

टॅग्स :goaगोवा