म्हापसा: सलग ३ दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे विकेंड साजरा करण्यासाठी गोव्यातील किनारी भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढली आहे. नाताळ तसेच नविन वर्षानंतर आलेल्या सलग सुट्ट्यातून वाढलेल्या पर्यटकांमुळे व्यवसायिक आनंदित झाले आहेत. मात्र त्याचबरोबर वाहनांची संख्या वाढल्याने बºयाच भागात वाहतुकीची कोंडीत भर पडली आहे.
शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीला लागून शनिवार तसेच रविवाराची आठवड्याची सुट्टी आल्यानेसुट्ट्या घालवण्यासाठी गोव्यात येणारेपर्यटक बरेच वाढलेआहेत. इतर किनारी भागांच्या तुलनेत कळंगुट, कांदोळी तसेच बागा परिसरात येणाºया पर्यटकांची संख्या जास्त आहे. आलेले बहुतेक पर्यटक हे स्वताची वाहने घेऊन आले आहेत. त्यामुळे वाहनांची कोंडी होण्यास कारण ठरले आहे.नाताळ तसेच नविन वर्षानंतर किनारी भागातील पर्यटकांची संख्या घटली होती. त्यातून किनारी भागात पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झालेला. आता तीन दिवस का होईन पर्यटक वाढल्याने व्यवसायिक मात्र आनंदित झाले आहेत. कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास सर्वत्र वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.