पणजी : केंद्र सरकारने आणलेल्या ‘रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयक २0१५’चा निषेध करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी कामगार नेत्यांकडून देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये गोव्यातील आयटकसारख्या कामगार संघटना, तसेच कदंब बसचालकांसह सार्वजनिक वाहतूकदार सहभागी होणार आहेत. यामुळे गोव्यातही २ रोजी वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसणे अपेक्षित आहे. केंद्रातील भाजपा सरकारने खासगी क्षेत्र, राज्य वाहतूक उपक्रम, टॅक्सी, ट्रक, बस, रिक्षा, पायलट यांचा धंदा नष्ट करण्यासाठी आणलेले विधेयक धोकादायक आहे. मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशात प्रवेश देऊन राज्यातील सार्वजनिक क्षेत्रामधील वाहतूक उपक्रम, स्वरोजगारित व्यवसाय करणाऱ्यांना पूर्णत: नष्ट करण्याचा उद्देश आहे. हे विधेयक संमत झाल्यास प्रचंड बेकारी निर्माण होईल. (पान २ वर)
गोव्यातही २ रोजी वाहतूक बंद
By admin | Published: August 28, 2015 2:48 AM