पणजी : आॅल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट महासंघाने गुरुवार, दि. १ आॅक्टोबरपासून बेमुदत वाहतूक बंदची हाक दिल्याने आंतरराज्य बस व माल वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या महासंघाशी संलग्न फोंडा गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने बंदमध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले असून गुरुवारी सकाळी १0 वाजता कुर्टी येथे ‘चक्का जाम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील औद्यागिक तसेच अन्य माल बाहेर जाणार नाही. तसेच बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, नाशिक व अन्य भागांतून येणारे मालवाहू ट्रकही बंद होतील. त्यामुळे कडधान्ये, भाजीपाला, दूध तसेच अन्य मालाचा पुरवठाही होऊ शकणार नाही, असे फोंड्यातील संघटनेचे अध्यक्ष फिरोझ खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टोल काढून टाकावेत, तसेच वाहतूकदारांना लागू केलेला टीडीएस रद्द करावा, या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (पान २ वर)
वाहतूकदारांचा बेमुदत बंद
By admin | Published: October 01, 2015 1:37 AM