शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

गोव्यात ट्रॉलर व्यावसायिकांना झाले ‘नाकापेक्षा मोती जड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 10:34 PM

- ओडिशा, झारखंडमधून खलाशांना आणण्यासाठी मोठा खर्च

पणजी : राज्याच्या अर्थकारणात मोठा हातभार लावणारा मच्छिमारी व्यवसाय कोविडमुळे अजून मार्गी लागू शकलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात गांवी गेलेले ओडिशा, झारखंडचे खलाशी रेलगाड्या सुरु न झाल्याने अजून परतलेले नाहीत त्यामुळे मालिम जेटीवरील ३५0 ट्रॉलरपैकी केवळ १0 ते १५ ट्रॉलरच मच्छिमारीसाठी जाऊ शकले.

मालिम फिशरमेन्स को. आपॅरेटिव्ह सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब म्हणाले की, ‘ रेलगाड्या सुरु झाल्याशिवाय या व्यवसायाचे काही खरे नाही. काही ट्रॉलरमालकांनी ओडिशा, झारखंडकडे येथून बसगाड्या पाठवून खलाशांना आणले. परंतु ते परवडणारे नाही. प्रत्येक खलाशामागे दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो. मोठा पर्सीननेट ट्रॉलरसाठी २५ ते ३0 खलाशी लागतात आणि छोट्या ट्रॉलरसाठी किमान दहा खलाशी लागतात.’

केंद्र सरकारने केवळ विशेष रेलगाड्या सुरु केलेल्या आहेत. जनरल रेलगाड्या अजून सुरु झालेल्या नाहीत. भुवनेश्वर-मुंबई रेलगाडी आहे. परंतु या खलाशांना ते रहात असलेल्या खेड्यापाड्यांमधून भुवनेश्वरला येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नाही. सध्या सुरु झालेल्या विशेष रेलगाड्या ठराविकच स्थानकांवर थांबे घेतात. त्यामुळे रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याशिवाय या खलाशांना त्यांच्या गावातून गोव्यात येणे शक्य नाही.  राज्यात एकूण सात मच्छिमारी जेटींवर मिळून १२00 हून अधिक ट्रॉलर्स आहेत. यात मालिम ही सर्वात मोठी जेटी होय. कुटबण, बेतुल, वास्को, कुठ्ठाळी, शापोरा येथेही मच्छिमारी जेटी आहेत. या सर्व जेटींवरील हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे अवघेच काही ट्रॉलर चालू झाले आहेत. कारोना महामारीच्या या संकटात निसर्गानेही मच्छिमारांवर अवकृपा केली आहे. येत्या १0 तारीखपर्यत समुद्र खवळलेला असेल तसेच वारेही वेगाने वाहणार आहे त्यामुळे मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान वेधशाळेने दिला आहे.

करंझाळेला मासळी खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल 

शारीरिक दुरी पाळण्याची बैठकीत सक्त ताकीद

करंझाळेला रांपणीची मासळी खरेदी करण्यासाठी रोज लोकांची झुंबड उडते व त्यामुळे शारिरिक दुरीच्या मार्गदर्शक तत्त्वांनाही हरताळ फासला जातो याची जिल्हाधिकाºयांनी गंभीर दखल घेऊन मासळी व्यावसायिकांची बैठक घेतली. शारीरिक दुरीचे काटेकोर पालन करुनच मासळी विकावी, अशी सक्त ताकीद देण्यात आली. महापौर उदय मडकईकर यांनी ही माहिती दिली. बैठकीला जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका, स्वत: महापौर, आयुक्त संजित रॉड्रिग्स, मनपाचे संबंधित प्रभागाचे नगरसेवक तसेच मच्छिमारी खात्याचे अधिकारी, मासळी व्यावसायिक व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या