पणजी- एक आयआयटीयन इंजिनीअर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शेवटपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते. ट्विटरवरून ते नेहमीच कार्यरत असायचे. त्यांनी शेवटचं ट्विट पाच दिवसांपूर्वी केलं होतं. विशेष म्हणजे शेवटच्या ट्विटमध्येही पर्रीकरांनी भाऊसाहेब नावानं प्रसिद्ध असलेले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांची आठवत काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त पर्रीकरांनी लिहिलं होतं की, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद(भाऊसाहेब) बांदोडकरांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. गोव्याच्या प्रगतीचा मजबूत पाया रचण्यासाठी भाऊसाहेब यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. भाऊसाहेब हे महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे नेते होते, ते 1963मध्ये गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1973पर्यंत लागोपाठ तीन वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. भाऊसाहेब यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शशिकला काकोडकर यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. ज्या गोव्याचे एकमेव महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत.
Manohar Parrikar Death: स्वतःच्या शेवटच्या ट्विटमध्ये पर्रीकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 8:33 AM