गोव्यात काँग्रेसचे २ आमदार गेले भाजपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:53 AM2018-10-17T05:53:39+5:302018-10-17T05:53:56+5:30
पणजी : काँग्रेसच्या सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांनी भाजपाध्यक्ष अमित ...
पणजी : काँग्रेसच्या सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या राजीनाम्यामुळे ४0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ सोळावरून १४ झाले.
सत्ताधारी भाजपाकडे चौदा आमदार आहेत. यापैकी तिघे गंभीर आजारी आहेत. दोघे इस्पितळात आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दोघांचे भाजपामध्ये स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे आदी त्यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचा उत्तराधिकारी भाजपाने अद्याप ठरविलेला नाही. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री व भाजपा नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दोघांना पक्षात घेण्याच्या निर्णयावर टीका केली.