लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : कोकण रेल्वे मार्गावर दोन नवीन रेल्वे धावणार आहेत. रेल्वे गाडी क्रमांक ०१४५५ ही १५ एप्रिल ते ३ जून पर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथून ०१.१० वाजता सुटेल व त्याच दिवशी १४.३५ वाजता करमली येथे पोहोचेल.
रेल्वे गाडी क्रमांक ०१४५६ ही १५ एप्रिल ते ३ जूनपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी करमली येथून १६.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिन्लस येथे पोहोचणार आहे. या गाडीला २१ डबे आहेत. ठाणा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड व थिवी रेल्वे स्थानकावर थांबा घेईल.
रेल्वे क्रमांक ०१०४९ पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन सुपरफास्ट रेल्वे पुणे येथून गुरुवार दि. १३ एप्रिल ते २५ मे पर्यंत दररोज गुरुवारी १८:४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी वाजता एर्नाकुलमला पोहचणार आहे. रेल्वे गाडी क्रमांक ०१०५० ही एर्नाकुलम येथून १४ एप्रिल ते २६ मे पर्यंत आठवड्याच्या दररोज शुक्रवारी २३:२५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी ०२:४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. लोणावला, चिपळुण, सावंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुंदापूर, त्रिसूर अशी असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"