पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) जे कोरोनाचे चार संशयीत रुग्ण होते, त्यापैकी दोघांबाबतचे अहवाल शुक्रवारी सकाळी नकारात्मक आले. त्यामुळे त्यांना घरी जाऊ दिले गेले. दोघे गोमेकॉत आहेत तर वीसजण स्वत:च्या घरीच आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवली गेली आहे.
गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांच्यासोबत आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचे चार संशयीत गोमेकॉत होते. दोघांविषयी अजून अहवाल आलेले नाहीत. त्यात एक ब्रिटिश महिलाही आहे व एक नेपाळी आहे. गोमेकॉसह राज्यातील चार सरकारी इस्पितळांमध्ये खास कोरोनाच्या संशयीत रुग्णांसाठीच 33 खाटा ठेवल्या गेल्या आहेत. गोमेकॉत काही नर्सेसना सुरक्षेखाली ठेवले गेले आहे. त्याच नर्सेस कोरोना संशयीतांच्या वॉर्डमध्ये जातात, असे डॉ. बांदेकर यांनी स्पष्ट केले.
वीसजण किडणीच्या प्रतिक्षेत दरम्यान, अवयव दानाविषयी गोव्यात अधिकाधिक जागृती व्हावी म्हणून सोटो संस्थेकडून मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. रविवारी दोनापावल येथून मॅरेथॉनला सुरूवात होईल. डॉक्टर्स,नर्सेस, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते या मॅरेथॉनमध्ये भाग घेतील. गोव्यात फक्त पंचवीस व्यक्तींनी आतार्पयत अवयव दानासाठी शपथ घेतलेली आहे. ऑनलाईन शपथ घेणो सहज सोपे आहे पण लोक पुढे येत नाहीत. राज्यात वार्षिक सुमारे तिस-पस्तीसजण ब्रेन डेड असतात. युवकांची संख्या जास्त आहे. त्यांनी अवयव दान करावे म्हणून जागृती व्हायला हवी. राज्यात वीस व्यक्ती किडणी रोपणाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी किडणी दानासाठी सध्या कुणी नाही. या व्यतिरिक्त गोमेकॉत वीस किडणी रोपणाच्या श क्रिया पार पडल्या आहेत, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.