शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दिवाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दक्षिण गोव्यात आलेले दोन पर्यटक बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 6:46 PM

दिवाळीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडने दक्षिण गोव्यात दोन पर्यटकांचे बळी घेतले असून, पहिला मृत्यू शनिवारी सायंकाळी कुळे येथील दुधसागर धबधब्यावर झाला तर दुसरा मृत्यू काणकोण येथील पाळोळे समुद्रात झाला.

मडगाव: दिवाळीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडने दक्षिण गोव्यात दोन पर्यटकांचे बळी घेतले असून, पहिला मृत्यू शनिवारी सायंकाळी कुळे येथील दुधसागर धबधब्यावर झाला तर दुसरा मृत्यू काणकोण येथील पाळोळे समुद्रात झाला.कुळे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, शनिवारी सायंकाळी 5 वा. पुण्यातील पिंपरी येथून आलेल्या सुरेशन नायर या 54 वर्षीय मूळ केरळचा असलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाला. सदर पर्यटक सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंब व मित्र परिवारासह गोव्यात आला होता. दुधसागर धबधब्यावर पाण्यात पोहत असताना तो अचानक बुडाला. काही वेळाने त्याला पाण्यातून बाहेर काढून पिळये-धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले. दुसरी घटना शनिवारीच पाळोळे येथे घडली. काणकोण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, बंगळुरु येथील अशोक एम. या 29 वर्षीय पर्यटकाला बुडून मृत्यू आला. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.