शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

गोव्यात पर्यटक हंगाम्यात वाढताय तस्करीचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 7:26 PM

गोवा हे लाखो पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनल्याने येथे तस्करीचे प्रमाणही वाढलेले असून याकरीता दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागालाही तेवढीच सतर्कता वाढवावी लागली आहे.

- पंकज शेट्येवास्को: गोवा हे लाखो पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनल्याने येथे तस्करीचे प्रमाणही वाढलेले असून याकरीता दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागालाही तेवढीच सतर्कता वाढवावी लागली आहे. गोव्यात पर्यटक हंगामा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विविध देशातील पर्यटक येथे येण्यास सुरू झाले असून विमानतळावरील कस्टम विभागाने तस्करीच्या प्रकारावर नजर ठेवण्यास सध्या कडक सतर्कता बाळगलेली आहे.यंदाच्या आर्थिक वर्षापासून (एप्रलि २०१८ पासून) आता पर्यंत विमानतळावरील कस्टम विभागाने १३ मोठ्या प्रकरणात एकूण साडेसात किलो वजनाचे सोने जप्त केले असून ६९ लाख रुपयांची विदेशी चलने जप्त केली आहेत. ह्या वर्षाच्या आर्थिक वर्षापासून अजून पर्यंत जप्त करण्यात आलेली तस्करीची एकूण रक्कम अडीच कोटी रुपये असल्याची माहीती दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक कमिशनर डॉ. राघवेंद्र.पी यांनी दिली.मागच्या काही वर्षात दाबोळी विमानतळाच्या मार्गाने गोव्यात तस्करीचे सोने व विदेशी चलने आणण्याचे प्रकार बºयाच प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले असून येथील कस्टम विभागाच्या सतर्कते मुळे त्यांचे हे प्रयत्न फसत असल्याचे दिसून आले आहे. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने ह्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अजून पर्यंत १३ मोठ्या प्रकरणात साडेसात किलो वजनाचे सोने व ६९ लाख रुपयांची विदेशी चलने जप्त केली आहेत. ह्या प्रकरणांपैकी पाचमध्ये विदेशातून आलेल्या प्रवाशांनाही कारवाईसाठी अटक करण्यात आलेली असल्याची माहीती कस्टम विभागाचे सहाय्यक कमिशनर डॉ. राघवेंद्र यांनी दिली. ह्या वर्षाच्या अजून पर्यंतच्या कारवाईत एकूण अडीच कोटी रुपयांचा तस्करीचा माल (सोने, विदेशी चलने इतयादी) कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर जप्त केला आहे.मागच्या आर्थिक वर्षाच्या काळात (२०१७ - १८) दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने २१ मोठ्या कारवाईत २१ किलो तस्करीचे सोने जप्त केले असून सोने व इतर तस्करीचा माल मिळून एकून ५ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती अशी माहीती डॉ. राघवेंद्र यांनी दिली. मागच्या वर्षाच्या कारवाईतील आठ प्रकरणात विदेशातून आलेल्या प्रवाशांना कारवाईसाठी अटक करण्यात आले होते. ह्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अजून पर्यंत पकडण्यात आलेल्या विविध तस्करीच्या प्रकरणात विविध प्रकारे सोने दाबोळी विमानतळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले, मात्र कस्टम विभागाच्या अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे त्यांचे हे बेत फसले. यात दुधाच्या पावडर मध्ये सोन्याचा पावडर मिसळून आणणे, ‘नॉन स्टीक पॅन’ तव्याच्या हॅन्डलचे स्क्रु सोन्याचे बनवून लावणे, महीलांच्या ड्रेस मटेरीयलच्या एम्रोडरीच्या झरी सोन्याच्या बनवून आणणे, कमरेच्या बेल्टमध्ये सोने लपवून आणणे, हातात घालणाºया घड्याळाचे काटे तसेच डायल सोन्याचे बनवून आणणे, स्वताच्या गुप्त भागात सोने घालून आणणे अशा विविध प्रकारे तस्करीचे सोने आणण्यात आलेल्यांना दाबोळी विमानतळावर ह्या आर्थिक वर्षाच्या काळात पकडण्यात आलेले असल्याची माहीती डॉ. राघवेंद्र यांनी पुढे दिली. तस्करीचे सोने विमानात घेऊन आल्यानंतर काही जण भितीपोटी ते नंतर विमानाच्या प्रवाशी खुर्चीखाली अथवा शौचालयात ठेवून गेलेले असल्याची प्रकरणे कारवाईत आढळून आल्याचे राघवेंद्रा यांनी माहीतीत पुढे सांगितले.तस्करीचे सोने आणण्यासाठी एक काळ असतो असे मुळीच नसून वर्षाचे बारीही महीने तस्करीचे प्रकार होत असल्याचे दिसून आल्याचे राघवेंद्र यांनी पुढे सांगितले. गोवा लाखो पर्यटकांचा आकर्षण केंद्र असल्याने येथे तस्करीची प्रकरणेही वाढल्याचे दिसून आले असून गोव्याच्या पर्यटक हंगाम्यात दाबोळी विमानतळावरून तस्करीचे सोने अथवा इत्यादी माल आणण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी येथील कस्टम अधिकारी पूर्णपणे सतर्कता बाळगत आहेत. तस्करीचे सोने बाहेर काढण्याकरीता विविध प्रकारच्या नवीन हालचाली आकारण्यात येत असल्याचे मागच्या काही काळात दिसून आलेले असून त्याची जाणीव आमच्या अधिकाºयांना असावी व अशा लोकांचे बेत फसावेत यासाठी आमच्या अधिकाºयांनाही वेळोवेळी याबाबत माहिती व विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे राघवेंद्र यांनी सांगितले.प्रवाशांची वागणूक त्यांच्या हालचाली ह्या गोष्टीवर बारकाईने नजर ठेवण्याचे काम कस्टम विभागाने अधिकारी योग्य रित्या करत असल्यानेही अशा प्रकारच्या तस्करीची प्रकरणे दाबोळी विमानतळावर मागच्या काही काळात उघड झालेली असल्याचे राघवेंद्र यांनी सांगितले. गोव्यात पर्यटक हंगाम्याला सुरवात झाल्यानंतर कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावरील सतर्कतेत आणखीन वाढ केलेली असून विमानतळावरील कस्टम विभागाचे कमिशनर आर.मनोहर व अतिरिक्त कमिशनर गजालक्षीमी यांच्या मार्गदर्शनाखाली दाबोळी विमानतळावरून येणाºया प्रवाशांवर कस्टम विभागाचे अधिकारी चौख रित्या नजर ठेवत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.