पणजी : उकाड्याचा त्रास आणखी वाढणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान खात्याच्या गोवा विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सीयसच्या आसपास राहणार आहे. सोमवारी गोव्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सीयस एवढे होते. सामान्य प्रमाणापेक्षा ते अधिक होते. तापमानाचा ताप अजूनही वाढणार अहे. येता आठवडा हा अधिक उकाड्याचाच जाणार आहे. दिवसाचे तापमान ३६ अंश सेल्सीयसपर्यंत वाढणे शक्य असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रात्रीचे तापमानही फार खाली जात नाही. सोमवारी २६ अंश सेल्सीयस एवढेच खाली आले होते. येत्या आठवड्यातही त्यात फारसा बदल होण्याचे संकेत नाहीत. तापमान वाढीबरोबरच हवेतील आर्द्रताही वाढली आहे. सोमवारी ७७ टक्के आर्द्रता होती, अशी हवामान खात्याची नोंद आहे. सामान्य प्रमाणापेक्षा तीन टक्क्याने ती अधिक आहे. त्यामुळे उकाड्याचा त्रास अधिक जाणवत आहे.
उकाडा आणखी वाढणार!
By admin | Published: May 03, 2016 1:57 AM