पंकज शेट्ये/वास्कोवास्को: साळावली हून दक्षिण गोव्यातील सासष्टी आणि मुरगाव तालुक्यात जाणारी पाण्याची १२०० एमएम डाय ची नवीन भूमीगत वाहिनी शनिवारी (दि.१३) कोंन्सुआ, कासावली येथे फुटली. त्या वाहिनीचे दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सासष्टी आणि मुरगाव तालुक्यात सुमारे ६० टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या अधिकाºयाने व्यक्त केली. वाहिनीच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करून रविवारी (दि.१४) सकाळी ११ पर्यंत वाहिनी दुरूस्त होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयाकडून मिळालेल्या माहीतीनुसार शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास कोंन्सुआ, कासावली येथे भूमीगत पाण्याची वाहिनी फुटल्याची माहीती त्यांना मिळाली. पाण्याची वाहिनी फुटल्याने ती दुरूस्त करण्यासाठी त्या परिसरातील वाहिनीमधून जाणारा पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच वाहिनी फुटल्याने ती दुरूस्त करण्यासाठी त्यातील पाणी खाली करण्याचे काम सुरू केले असून वाहिनीतील पाणी खाली झाल्यानंतर दुरूस्तीचे काम सुरू होईल. शनिवारी पूर्ण रात्र वाहिनीचे दुरूस्तीचे काम करण्यात येणार असून रविवारी सकाळी ११ पर्यंत वाहिनी दुरूस्त होणार असा विश्वास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
पाण्याची भूमिगत वाहिनी फुटल्याने आणि तिच्या दुरूस्तीचे काम चालू असल्याने मुरगाव आणि सासष्टी तालुक्यात नेहमीपैक्षा बºयाच कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहीती प्राप्त झाली. रविवारी सकाळपर्यंत वाहिनी दुरूस्त होणार असून त्यानंतर पाण्याचा पुरवठा सुरळीत होणार अशी माहीती अधिकाºयाकडून मिळाली.