पणजी: उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) चक्रीवादळे ही साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला किंवा मान्सूनच्या अखेरीस म्हणजे मान्सून संपल्यावर भारतीय महासागरात उत्पन्न होत असतात. परंतु चक्रीवादळ ओखी हे चक्क दोन महिने उशिरा आल्यामुळे अनपेक्षित चक्रीवादळ ठरले आहे, असं मत हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम. एन. साहू यांनी मांडलं आहे.मान्सूनपूर्व चक्रीवादळे हे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस येत असतात. तसेच मान्सूननंतरची चक्रीवादळे ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात येत असतात. उशिरात उशिरा नोव्हेंबरमध्ये येत असतात. परंतु यावेळी डिसेंबर भारतीय महासागरात डिसेंबर महिन्यात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे ही अनपेक्षित घटना आहे. आतापर्यंतच्या इतिहासात डिसेंबरमध्ये चक्रीवादळे उत्पन्न होण्याचे प्रकार क्वचित घडले आहेत.या विषयी हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम. एन. साहू म्हणाले की, मान्सूनोत्तर चक्रीवादळे ही सहसा ऑक्टोबरमध्येच होत असतात. परंतु पावसाळ्यानंतरचे तीन महिने हा चक्रीवादळाचा काळ असे गणले जात आहे. चक्रीवादळाचाच काळ असे गणले जात असल्यामुळे ऋतुचक्र सरकले वगैर म्हणता येणार नाही असे ते म्हणाले. श्रीलंकेजवळ भारतीय महासागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा वेगवान बनून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले होते.
ओखी चक्रीवादळ अनपेक्षित, चक्क दोन महिने आले उशिरानं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 11:39 PM