शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर

By किशोर कुबल | Published: September 12, 2022 9:00 PM

हरयानातील खाप महापंचायतीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती.

पणजी : अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरण सीबीआयकडे देण्यात येत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज सोमवारीच केंद्रीय गृहमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असून हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची विनंती करणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. सायंकाळी गृह मंत्रालयाने प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यास परवानगी दिली. दिल्लीहून तसे जाहीरही करण्यात आले.

हरयानातील खाप महापंचायतीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. अन्यथा २४ रोजी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. तसेच हायकोर्टात जाण्याचीही तयारी चालवली होती. प्रकरण सीबीआयकडे द्यावे यासाठी सर्व थरातून सरकारवर दबाव येत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,‘ गोवा पोलिसांकडून उत्तम प्रकारे तपासकाम चालले होते. काही महत्त्वाचे धागेदोरेही पोलिसांना मिळाले होते. परंतु हरयानातील लोकांकडून तसेच सोनाली यांच्या कन्येकडून व नातलगांकडून हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या मागणीस अनुसरुन हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची विनंती केंद्राकडे केली जाईल.’

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गोवा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत आली होती. माझा आमच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. परंतु वाढत्या मागणीमुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे लागत आहे. आजच मी विनंतीपत्र केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवणार आहे.’

टिक टॉक फेम तथा बीग बॉस रिअ‍ॅलिटी शो मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली फोगाट हिचा गेल्या महिन्यात हणजुण येथील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. ड्रग्स पाजून तिला ठार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करुन एकूण पाच जणांना अटक केली. पैकी ज्या कर्लीस शॅकमध्ये तिला ड्रग्स पाजण्यात आले त्या शॅकचा मालक एडविन नुनीस हा तेवढा जामिनावर सुटलेला आहे. बाकी चारजण कोठडीत आहेत.

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटCBIगुन्हा अन्वेषण विभागAmit Shahअमित शाह