पणजी : केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना आता गोमेकॉ इस्पितळाच्या आयसीयू विभागातून १२१ वॉर्डाच्या व्हीव्हीआयपीखोलीत (क्रमांक एक) हलविण्यात आले आहे.
वाहन अपघतानंतर गेले अनेक दिवस नाईक हे आयसीयूमध्ये उपचार घेत होते. ते ठीक होत आहेत. गोमेकॉचे डीन डॉ शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक यांच्या रक्त चाचण्यांचे सर्व अहवालही नॉर्मल आहेत. अजून त्यांना नेसल ऑक्सीजन दिला जात आहे. त्यांचे ऑक्सीजन सेच्युरेशन १०० टक्के आहे. नाईक यांना झालेल्या जखमा ठीक होत आहेत. त्या भरून येत आहेत. त्यांना फिजिओथेरपी देणे सुरू ठेवले आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी पुन्हा आयसीयूला भेट दिली व नाईक लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.