नारायण गावस
पणजी: रायबंदर भागात स्मार्ट सिटीअंतर्गत माेठी पाईपलाईन तसेच सांडपाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम लवकरच सुरु हाेणार आहे. यासाठी रायबंदर भागातील नगरसेवक तसेच ग्रामस्थांची स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत रायबंदर भागात आता सांडपाण्याच्या पाईपलाईनचे काम केले जाणार. या विषयीची माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी रायंबदर ग्रामस्थ व नगरसेवकांना दिली. या बैठकीत प्रभाग २८ चे नगरसेवक विठ्ठल चाेपडेकर, प्रभाग २९ नगरसेवक सिल्वस्टर फनार्डिस प्रभाग ३० चे नगरसेवक सेंड्रा मारिया दी कुन्हा व उपस्थित होते.
पणजी स्मार्ट सिटीची काम गेले अनेक वर्षा पासून सुरु आहे. पाईपलाईनसाठी रस्त्याचे खाेदकाम केले आहे. पणजीत माेठ्या प्रमाणात लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी रायबंदर वासियांनी बैठक घेऊन या विषयी सर्व माहिती देण्याची मागणी केली होती. यामुळे स्मार्ट सिटीचे अधिकारी रायबंदर भागात सांडपाण्याची पाईर्पलाईन घालण्याचे कामाची बैठक घेतली. हे ३० दिवस पर्यंत काम चालणार असल्याने वाहतूकीस अडथळा येणार आहे. यासाठी बायपास तसेच इतर साेयही केली जाणार असल्याचे. स्मार्ट सिटीचे प्रकल्प अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
तसेच सर्व काम एकदम हाती घेतले जाणार नाही टप्प्या टप्प्याने काम केले जाणार आहे. यामुळे लोकांना अडथळा होणार नाही तसेच धूळाची समस्या होऊ नये यासाठी पाण्याचे टॅकर तसेच काम हे रात्रीचे केले जाणार आहे. लोकांना कुठलाच त्रास हाेणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. मोठी वाहतूक बायपास मार्गे वळविली जाणार, असे यावेळी संजित रॉड्रिग्ज यांनी सांगितले. रायबंदर भागात सांडपाण्याची पाईपलाईन गरजेची आहे. अनेकांचे सांडपाणी हे मांडवी नदीत साेडले जाते. तसेच सांडपाण्याची समस्या मोठी आहे. यामुळे आम्ही या कामाला मान्यता दिली आहे. आम्ही अडथळा होणार म्हणून विरोध केलेेला नाही. प्रत्येक कामाला विरोध करणे चुकीचे आहे. विकासासाठी काही काळ त्रास सहन करावा लागेल. असे काही या बैठकीत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.