ऑनलाइन लोकमतमडगाव (दक्षिण गोवा ), दि. 18 : वापर नसणारा जुना पदपूल कोसळून अंदाजे पन्नास ते सत्तर लोक जुवारी नदीत पडले.तिस्क-सावर्डे (ता. धारबांदोडा, जि. दक्षिण गोवा) येथे गुरूवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली.
पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्याचा मतदेहाचा पोलिस नदीपात्रात होडीच्या सहाय्याने शोध घेत होते. ते पाहण्यासाठी बघ्यांची तोबा गर्दी झाली आणि त्यांच्या वजनाने हा पूलच कोसळला. या घटनेनंतर सुमारे 12 ते 15 जणांनी पोहत किनारा गाठला तर सहा जणांना लोकांच्या साहाय्याने बुडताना वाचविले. कोसळलेल्या पुलाच्या भागात लटकलेल्या दहा ते बारा जणांना बाहेर काढले. रात्री साडेनऊच्या सुमारास एकाचा मृतदेह मिळाला. अन्य बेपत्ता 15 किंवा वीस जणांचा क्रेन तसेच नौदलाच्या होडय़ांच्या सहाय्याने शोध रात्री उशिरार्पयत सुरु राहिला. त्यामुळे नेमकी आकडेवारी कोणीही ठामपणे सांगू शकत नव्हते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती घटनास्थळी व्यक्त होत होती. नौदलाचे जवानही मदत करत आहेत.
मडगावपासून उत्तरेला तीस किलोमीटरवरील सावर्डेतील या घटनेमुळे खळबळ माजली. सावर्डे दक्षिण रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन. तेथे हा पदपूल आहे. त्याचा वापर होत नाही. तो गंजलेला आहे. तो कोसळल्यावर लोकांचा मोठा आरडा-ओरडा झाला. काही कळण्याच्या आत किमान पन्नास ते सत्तर लोक नदीत पडले.
कुडचडे पोलिसांना प्रारंभी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जुवारी नदीच्या पात्रात वहात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या साहायाने कुडचडे ते सावर्डेला जोडणा:या पुलाखालून मृतदेह काढण्यास प्रारंभ केला. ते पाहण्या साठी नवीन पुलाच्या शेजारी असलेल्या सुमारे चाळीस वर्षे जुना आणि सध्या वाहतुकी साठी पूर्ण बंदच अलेल्या पदपुलावर शेकडो लोक उभे होते. अचानक पद पुलाचा एक भाग कोसळला सुमारे पन्नास ते सत्तर लोक नदीत पडले. अनेकांना पुलाच्या लोखंडी भागांना आपटून जबर मार बसला. त्याही स्थितीत काहींनी पोहत किनारा गाठला. पडलेला पूल क्रेन द्वारे वर खेचला असता पुला खाली दबलेला एक मृतदेह मिळाला. पोलिसांना बसवराज मरेनवार या सांगे गावातील युवकाचे पाकीट सापडून आले. तो मृतदेह मरेनवार याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मागे एक प}ी आणि तीन लहान मुले आहेत.
बेपत्ता व्यक्तींची काहीही माहिती नाही, तसेच नदी पात्रात खोलवर जाऊन शोधणारी व्यक्तीही नाही अशा अडचणी पोलिस आणि अग्निशामक दलासमोर होत्या. अग्निशामक दलाची विद्युत सामग्री आणून शोधकार्य हाती घेतले. दांडो- सांगे गावातील फ्रान्सिस फेर्णांदिस यांना बोलावून आणले. त्यांनी नदीत खोलवर जाऊन शोध घेतला. तसेच नौदलाच्या जवानांनीही मोठी मदत केली
दरम्यान खासदार नरेंद्र सावईकर यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नौदलाला मदातीचे आवाहन केले आहे.
https://www.dailymotion.com/video/x844z7t