लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काल दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि गोव्यातील पायाभूत सुविधांबाबतीच्या गंभीर समस्या त्यांच्या नजरेस आणून दिल्या.
भोम-करमळी बगलमार्ग, करमल घाटातील समस्या निदर्शनास आणतानाच महामार्गालगत महिलांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. सरदेसाई यांनी गोव्यात रस्त्यांचे जाळे लक्षणीयरीत्या वाढविण्यासाठी, वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि गोमंतकीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्वरित लक्ष घालावे, अशी विनंती गडकरी यांना केली.
बाणावली राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वेस्टर्न बगल मार्गाला प्राधान्य द्यावे, अशी सरदेसाई यांची मुख्य मागणी होती. खारेबांध ते वार्का रस्ता स्टिल्ट्सवर बांधण्याचा प्रस्ताव दिला ज्यामुळे स्थानिक पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल आणि वाहतूक सुरळीत होईल असे सरदेसाई यांचे म्हणणे आहे. भोमा आणि खोल गावांच्या बाजूने बायपास बांधणे, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असलेली सातेरी आणि महादेव मंदिरे जपावीत, अशी विनंती त्यांनी केली. करमल घाटातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ६६ झाडे कापता पूल (व्हायडक्ट) बांधून पूण् करावा जेणेकरून हजारो झाडे वाचवत येतील, असे सरदेसाई यांन गडकरींच्या निदर्शनास आणले. राष्ट्रीय महामार्गालगत, विशेषत महिलांसाठी प्रसाधनगृहे नसल्याने ह मुद्दा उपस्थित करण्यात आला.