मडगाव: म्हादईचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सरकारने सोमवारच्या सुनावणीत गोव्याला 'अंतरिम रिलीफ मिळणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच लांबणीवर ठेवून अपेक्षाभंग केलेला आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून हा जबरदस्त धक्का आहे. भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हादईप्रश्नी लोकांची पूर्णपणे दिशाभूल करीत आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
सरदेसाई म्हणाले की, 'सुनावणीत दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाचे त्याकडे फारसे लक्ष वेधले नाही. सुनावणी थेट जुलैमध्ये ढकलली. कर्नाटकात २१ मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हादईची सुनावणी जुलैपर्यंत लांबणीवर टाकली. तोपर्यंत गोवा सरकार म्हादई रक्षणासाठी काहीच करु शकत नाहीत. हे नियोजित सेटिंग आहे.'
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"