पणजी : राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये (सीएचसी) आता रक्त तापसणीची सोय होणार आहे. सेमी ऑक्टो यंत्रे तिथे बसविली जाणार आहेत, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्यावर सरकारने भर दिला असून एकूण साडेचार कोटींची विविध प्रकारची वैद्यकीय उपकरणो त्यासाठी खरेदी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री राणे यांची येथे पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, की प्रथमच गोमेकॉच्या एकूण 33 डॉक्टरांच्या बॉण्डचा वापर करण्यात आला आहे. हे डॉक्टर मुख्य इस्पितळांमध्ये असतील पण त्या इस्पितळांच्या परिसरातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना भेटी देतील. दंत महाविद्यालयात अकरा दंत चिकित्सकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे व सामाजिक आरोग्य केंद्रांमध्येही ही पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्याचीही व्यवस्था नव्हती. ती आता सेमी ऑटो यंत्रामुळे होणार आहे.
मंत्री राणो म्हणाले, की म्हापसा, नावेली, फोंडा, वाळपई, बाळ्ळी अशा इस्पितळांमध्ये लवकरच डायलसिस सुविधा सुरू होणार आहे. बेतकी, वाळपई, शिरोडा, कुडचडे, काणकोण अशा विविध ठिकाणची इस्पितळे व सरकारी रुग्णालयांमध्ये अल्ट्रासाऊण्ड, एक्स-रे आदी उपकरणो बसविली जातील. काही इस्पितळांमध्ये कलर डॉपलरची व्यवस्था केली जाईल. ग्रामीण आरोग्य सेवा यापुढे खूप बळकट होतील.
कार्डियाक रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टर्स
पाच कार्डियाक रुग्णवाहिका येत्या जानेवारीमध्ये येत आहेत. यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी एमआरएफ कंपनीने देऊ केला आहे व दीड कोटींचा धनादेश नुकताच राज्य आरोग्य सोसायटीला प्रदान केला आहे. पाच एमबीबीएस डॉक्टरांना गोमेकॉने प्रशिक्षित केले अशून हे पाच डॉक्टर्स पाच कार्डियाक रुग्णवाहिकांमध्ये असतील. कुणाही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 1क्8 रुग्णवाहिकेतील हे डॉक्टर त्या रुग्णाला इंजेक्शन देतील. त्यामुळे त्याच्या हृदयाकडील रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक्स काही वेळासाठी दूर होतील. या रुग्णाला गोमेकॉत तरी नीट पोहचता येईल. तिथे त्याच्यावर उपचार केले जातील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
दि. 19 डिसेंबर्पयत दुचाकी रुग्णवाहिकांचे व एका व्हीव्हीआयपी रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले जाईल व दि. 15 जानेवारीर्पयत कार्डियाक रुग्णवाहिकांचे उद्घाटन होईल. सध्या राज्यात 1क्8 सेवेखाली एकूण 38 रुग्णवाहिका आहेत. आणखी सात येतील. येत्या एप्रिल-मे महिन्यार्पयत राज्यातील सगळ्य़ाच 1क्8 रुग्णवाहिकांमध्ये आधुनिक पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा असतील, असे राणे यांनी सांगितले.