- संदीप आडनाईक पणजी - ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर तर अभिनेत्री झीनत अमान यांना जीवन गौरव पुरस्काराने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले.येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या समारंभात गोव्यात १६ ते २४ जानेवारी या कालावधीत झालेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती प्रसारण विभागाचे सचिव अमित खरे,केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, चैतन्य प्रसाद आदी उपस्थित होते. अभिनेत्री सिमोन सिंग यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर तर अभिनेत्री झीनत अमान यांना जीवन गौरव पुरस्काराने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले. याशिवाय अभिनेता रवी किशन, राहुल रवैल यांनाही सन्मानित करण्यात आले.बीस साल बाद चित्रपटातल्या कुमार विजय सिंग,कोहरा मधल्या राजा अमित कुमार सिंग,एप्रिल फुल मधल्या अशोक, मेरे सनम मधल्या रमेशकुमार, नाईट इन लंडन मधला जीवन, दो कलिया मधल्या शेखर आणि किस्मतमध्ये त्यांनी साकारलेल्या विकीच्या भूमिकेला रसिकांची मोठी पसंती मिळाली. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज,माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रीसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये चौरीन्घी (१९६८), उत्तम कुमार यांच्यासमवेत गढ नसीमपूर, कुहेली आणि त्यानंतर श्रीमान पृथ्वीराज (१९७३),जय बाबा तारकनाथ (१९७७) आणि अमर गीती (१९८३) यांचा समावेश आहे. १९७५ मध्ये विश्वजीत यांनी ह्यकहते है मुझको राजाह्ण या चित्रपटाची निर्मिती आणि दिगदर्शन त्यांनी केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
विश्वजित, झीनत अमान यांचा गोव्यातील चित्रपट महोत्सवात गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 6:41 PM