शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

गोवा भाजपाने मागितली आर्चबिशपांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 5:53 PM

घटना धोक्यात आहे, मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, अशा काही अर्थाची गोव्याच्या आर्चबिशपांची विधाने सध्या चर्चेत असली तरी, येत्या दोन दिवसांत भाजपच्या गोवा प्रदेश पदाधिका-यांची व आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांची भेट होणार आहे.

पणजी : घटना धोक्यात आहे, मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, अशा काही अर्थाची गोव्याच्या आर्चबिशपांची विधाने सध्या चर्चेत असली तरी, येत्या दोन दिवसांत भाजपच्या गोवा प्रदेश पदाधिका-यांची व आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांची भेट होणार आहे. आर्चबिशपांची भेट गोवा भाजपने मागितली आहे. ती लगेच मिळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.भाजपाने संपर्कसे समर्थन असा कार्यक्रम देशभर हाती घेतला आहे. देशातील सर्व धर्मीयांचे गुरू, निवृत्त न्यायाधीश, लष्करातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, निवृत्त बडे खेळाडू आदींना भेटण्याचा उपक्रम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुरू केला आहे. विविध नेत्यांना भेटून मोदी सरकारने गेल्या चार वर्षात काय केले याविषयीची माहिती दिली जात आहे. पुढील 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी सर्वाचा पाठिंबा मिळावा, असा त्यामागील उघड हेतू आहे. भाजपाने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरून तसे जाहीरही केले आहे.शहा यांनी नुकतीच रामदेव बाबा, कपिल देव आदींची भेट घेतली. गोवा भाजपानेही संपर्कसे समर्थन कार्यक्रम गुरुवारी सुरू केला. कुंडई येथील तपोभूमीवर जाऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, खजिनदार संजीव देसाई आदींनी ब्रह्मेशानंद स्वामींची भेट घेतली. केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी व योजनांविषयी स्वामींना माहिती दिली. गोवा राज्याला मोदी सरकारचा काय फायदा झाला त्याविषयीही भाजप पदाधिका-यांनी ब्रह्मेशानंद स्वामींना माहिती दिली. मोदी सरकारमुळे जगात अनेक ठिकाणी भारतीयांप्रति आदर वाढला, असे ब्रह्मेशानंद स्वामींनी नमूद केल्याचे भाजप पदाधिका-यांनी लोकमतला सांगितले.दरम्यान, संपर्कसे समर्थन ह्या कार्यक्रमाचा भाग याच नात्याने गोवा भाजपाचे नेते आर्चबिशप फेर्राव यांना भेटणार आहेत. त्यांच्याकडून भेटीची वेळ कधी दिली जाते याकडे भाजपचे लक्ष आहे. आर्चबिशपांनाही मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली जाणार आहे, असे पक्ष सुत्रंनी सांगितले. आर्चबिशपांची काही विधाने ही राष्ट्रीय स्तरावर व गोव्यातही सध्या चर्चेची ठरली आहेत. मात्र त्या विधानांविषयी चर्चा करणो हा भाजपच्या आर्चबिशप भेटीचा हेतू नसेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपा