शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

'क' श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारकडून स्वेच्छा निवृत्ती जाहीर, मंत्रिमंडळ निर्णय

By किशोर कुबल | Published: November 29, 2023 4:42 PM

बैठकीनंतर पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. 

पणजी :  राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी सरकारी खात्यांमधील 'क' श्रेणी कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती जाहीर करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. बैठकीनंतर पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले की, 'सेवेतील शिल्लक वर्षांसाठी प्रतिसाल दोन महिने याप्रमाणे वेतनाचा लाभ दिला जाईल. स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करताना किमान पंधरा वर्षे सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सरकारी खात्यामध्ये काम करणारे शिपाई, कनिष्ठ लिपिक, अव्वल कारकून तसेच शाळांमधील शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, टेक्निशियन, पोलीस खात्यात कॉन्स्टेबल पासून उपनिरीक्षकांपर्यंत कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीचा लाभ घेता येईल.

कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही बाळंतपणाची सुट्टी सरकारी खात्यांमध्ये कंत्राटावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणाची सुट्टी मिळणार आहे. त्यासंबंधीचा महत्वाचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की,' केवळ बाळंतपणासाठीच नव्हे, तर गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये या सुट्टीचा लाभ कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना घेता येईल. यापूर्वी अशी सवलत केवळ सरकारी सेवेत कायम असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच होती. ती आता कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही लागू आहे. महागड्या मोटारींवरील करामध्ये कपातमहागड्या मोटारींवरील करामध्ये कपात करण्याचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक गोमंतकीय पुड्डूचेरी तसेच इतर ठिकाणी कर कमी असल्याने महागड्या मोटारी तेथे खरेदी करून गोव्यात आणत असत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारनेच करात कपात केली आहे. ६ लाख रुपयेपर्यंत मोटारीला ९ टक्के, ६ ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या मोटारीला ११ टक्के, १५ लाख ते ३५ लाखां पर्यंतच्या मोटारीला १३ टक्के आणि ३५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या मोटारीला आता १४ टक्के असा कर निश्चित केलेला आहे.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र सरकारी खाते नवीन वर्षात स्थापणारदिव्यांगांसाठी स्वतंत्र सरकारी खाते नवीन वर्षात स्थापन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, दिव्यांगाना त्यांच्या योजना तसेच इतर कोणत्याही बाबतीत कसलाच त्रास होऊ नये यासाठी हे स्वतंत्र खाते निर्माण केले जात आहे. नवीन वर्षात ते कार्यरत होईल.        म्हादईच्या बाबतीत गोव्याची बाजू मजबूत : मुख्यमंत्रीदरम्यान, म्हादईच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्याचे ॲडव्होकेट जनरल तसेच वकिलांची संपूर्ण टीम गोव्याची मजबूतपणे बाजू मांडण्यासाठी सज्ज आहे. सरकारने लवादाच्या आदेशाला, पावसाळ्यात कर्नाटकाने जे पाणी वळवले  याबद्दल तसेच कर्नाटकच्या वन्य प्राणी मंडळाने काढलेल्या आदेशालाही आव्हान दिलेले आहे. आमची बाजू मजबूत आहे. कर्नाटकने अजून कोणतेही दस्तऐवज कोर्टात सादर केलेले नाहीत.'

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत