ईव्हीएमवर नको बॅलेट पेपरवर मतदान घ्या, विरोधकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 04:26 PM2024-01-27T16:26:08+5:302024-01-27T16:27:08+5:30
यावेळी कॉँग्रेसचे नेते एल्विस गाेमस्, समाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकाेणकर, शंकर पोळजी व इतर सदस्य उपस्थित होते.
पणजी: ईव्हीएम मशिनने मतदान हे संविधानाच्या विरोधात आहे. आम्हाला ईव्हीएमवर मतदान करायचे नसून पूर्वी सारखे बॅलेट पेपरवर मतदार करायचे आहे, अशी मागणी गोवन्स अगेन्स इव्हीएम बॅनरखाली पणजीतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध समाजिक कार्यकर्त्यांनी केली. तसेच २ फेब्रुवारी राेजी म्हापसा आणि मडगाव येथे आयाेजित केलेल्या ईव्हीएम विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी हाेण्याचे आवाहनही जनतेला केले. यावेळी कॉँग्रेसचे नेते एल्विस गाेमस्, समाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकाेणकर, शंकर पोळजी व इतर सदस्य उपस्थित होते.
कॉँग्रेसचे नेते एल्विस गोमस् म्हणाले गेली अनेक वर्षे भाजपकडून ईव्हीएमद्वारे मतदान करुन फसवणूक केली जात आहे. देशभर विरोधकांचा ईव्हीएमला विरोध आहे. तरीही ईव्हीएमद्वारे मतदान केले जात आहे. बॅलेट पेपरवर मतदान करणे हा कायद्याने अधिकार आहे. पूर्वी पासून लोक बॅलेटवर मतदान करत आलो आहोत. ईव्हीएम मशिनमध्ये माेठ्या प्रमाणात घोळ केला जात आहे. तो कशा प्रकारे केला जाताे व फसवणूक कशी केली जाते हे जनतेला आम्ही २ राेजी आयोजित केलेल्या जनजागृती माहिमेत दाखविणार आहेत.
ईव्हीएम हे एक मशिन आहे आणि ते माणसाने तयार केले आहे. त्यामुळे ते कशा प्रकारे बदल घडवून आणू शकते. भाजपला जनतेवर विश्वास नसून ईव्हीएमवर जास्त आहे. म्हणून येत्या निवडणूकीत ते निवडून येण्याचा घोषणा करत आहेत. पण आमचा ईव्हीएमला पूर्ण विराेध असून निवडणूक आयाेगाने येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावे, असे प्रतिमा कुतिन्हाे यांनी सांगितले.