पणजी : राज्य सरकारची लाडली लक्ष्मी ही लोकप्रिय योजना असून वार्षिक सरासरी अकरा हजारांपेक्षा जास्त युवती या योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात. जानेवारी महिन्यार्पयत बरेच अर्ज सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने मंजुर केले. मात्र त्यानंतर अर्ज मंजुरच झालेले नाहीत. हजारो युवती व महिला सध्या लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून योग्य प्रमाणात वेळोवेळी निधी उपलब्ध होत नसल्याने लाडली लक्ष्मींना मदतीच्या प्रतीक्षेत रहावे लागले आहे.
लाडली लक्ष्मी योजना सुरू केल्यानंतर लगेच वर्षभरात म्हणजे 2क्13 सालार्पयत या योजनेच्या लाभार्थीची एकूण संख्या 1क् हजारपेक्षा जास्त झाली होती. सरकारने शंभर कोटी रुपये त्यावेळी खर्च केले होते. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुलींनी लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत अर्थसाह्यासाठी अर्ज करताच या योजनेखाली सरकार मुलींच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा करते. मुली विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करून हा पैसा बँकेतून व्याजासह लग्नाच्यावेळी प्राप्त करू शकतात. ही योजना युवतींना बरीच मदतरुप ठरली आहे. 2क्13 सालापासून जानेवारी 2क्18 र्पयतच्या कालावधीतही 5क् हजारपेक्षा जास्त युवतींना लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळाला आहे. 52क् कोटींपेक्षा जास्त पैसा सरकारने आतार्पयत म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षात लाडली लक्ष्मी योजनेवर खर्च केला. मात्र आता लाडली लक्ष्मी योजनेखाली अर्ज केल्यानंतर ते अर्ज लवकर मंजुरच होत नाहीत, तसेच अर्ज मंजुर झाले तरी, बँकेत निधीच येत नाही अशा प्रकारच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
महिला व बाल कल्याण खात्याने गेल्या जानेवारीत सुमारे चार हजार लाडली लक्ष्मींचे अर्ज मंजुर केले. त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक लाख रुपये जमाही झाले. मात्र जानेवारीनंतर महिला व बाल कल्याण खात्याने अर्जाना मंजुरी दिलेली नाही. काही हजार अर्ज सध्या खात्यात प्रलंबित आहेत. त्यांना मंजुरीही मिळाली नसल्याने अजर्दार युवतींमध्ये अस्वस्थता आहे. सरकारकडे पुरेसा निधी नसल्याने मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे.
लाडली लक्ष्मी, गृह आधार आदी योजनांचा समाजावर किती परिणाम होत आहे याचे सव्रेक्षण सध्या सुरू आहे. लाडली लक्ष्मी योजनेची अंमलबजावणी थांबलेली नाही पण अर्ज मंजुर होत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. या खात्याचे मंत्री विश्वजित राणो यांना लोकमतने गुरुवारी विचारले असता, ते म्हणाले की साधारणत: दोन- अडिच हजार अर्ज प्रलंबित असतील पण त्यावर प्रक्रिया सुरू आहे. ते मंजुर होतील. लाडली लक्ष्मींना निधीही मिळेल. गेल्याच जानेवारीत आम्ही चार हजार अर्ज मंजुर केले.