लोकमत न्यूज नेटवर्क गुळेलीः पंढरपुरातील विठ्ठ माऊलीच्या भेटीसाठी सत्तरीतील वारकरी यंदा मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. हरिनामाच्या, विठ्ठलाच्या जयघोषात लहानांपासून ते वृध्दांपर्यंत, महिला व पुरुष, युवा वारकरी, भक्त पायी वारी करून १२- १३ दिवसांचा प्रवास करत ऊन-पावसात नाचत-गात अखेर पंढरपूरला पोहोचले आहेत. तर काहीजण पोहोचण्याच्या मार्गावर आहेत.
विठ्ठलाच्या भक्तीत मग्न झालेल्या वारकरी भक्तांची महिमा अपार आहे. जगभरात विठूचे अनेक वारकरी असतील. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या एकमेकांच्या शेजारी असणाऱ्या राज्यात तर विठ्ठलाचे भक्तच भक्त. महाराष्ट्राबरोबर गोव्यातसुद्धा अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने वृद्ध जुन्या काळापासून दरवर्षी खंड न पडता वारीला जात असतात. पूर्वी वाहतुकीची साधने नव्हती. तरीसुद्धा देवावर असलेली श्रद्धा त्यामुळे कित्येक मैल चालत रात्र दिवस करत वारी पूर्ण करत असत. कालांतराने रस्ते आले, वाहतुकीची सोय झाली तरीसुद्धा पायी जाणारी वारी अजूनपर्यंत अस्तित्वात आहे.
उस्ते, कोदाळ, करमळी, केरी तसेच अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरला गेले आहेत. काहीजण रविवारी पोहोचले, तर काहीजण सोमवारी, मंगळवारी, काही बुधवारी काही उद्या पंढरपूरला पोहोचणार आहेत. ना भुकेची पर्वा नाव पावसाची, अशा प्रकारे भक्तीत मग्न होऊन अखेर विठ्ठलाचे भक्त विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे तमाम भक्तगणांनी आनंद व्यक्त केला आहे.
पाली येथील रोहिदास गावकर गेल्या कित्येक वर्षांपासून पंढरपूरला येऊन भजन सादर करतात सत्तरीबरोबर गोवा व राज्याबाहेर अनेक ठिकाणी तो भजन सादर करतो. आता विठ्ठलाच्या पायी देवाचे चरण स्पर्श करुन अत्यंत आनंद होत आहे.
विठ्ठलाच्या कृपेमुळे आपल्याला देवाची भक्ती व श्रध्दा व भजनाची कला प्राप्त झाली आहे. राज्यातून व सत्तरीतून लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत महिला व पुरुष यांचा सोहळ्यात सहभाग वाढत आहे. पंढरपूरला पोहोचून देवाच्या भक्तीत विलीन होण्याचे आहे. मला या ठिकाणी आपली कला सादर करण्याचे भाग्य प्राप्त होत असल्याने अत्यंत आनंद होत आहे.
उस्ते येथील श्रीराम वारकरी मंडळ
विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आम्हाला लागून होती. गेल्या १३ दिवसांपासून पायी वारी करताना विठ्ठलाच्या हरिनामाच्या जपाने पंढरपूरला कधी पोहोचलो हे कळलेच नाही. आम्ही दरवर्षी पंढरपूरला पाया वारी करतो. माझी मुले लहान आहेत, वारीत मुलांसमवेत आम्ही पाय वारी करतो आहोत. आज पंढरपूरला पोहोचून समाधान होत आहे. आता फक्त विठ्ठलाचे दर्शन घेणे बाकी आहे. पायी येताना अनेक अडीअडचणी आल्या, मात्र देवाने सर्व अडीअडचणी दूर करुन त्याच्याजवळ आम्हाला सुखरुप आणून पोहोचवले आहे. त्यामुळे देवावर असलेली श्रध्दा व प्रेम आणखी वाढले आहे.