सद्गुरू पाटील ल्ल पणजीमहाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत घातक ठरणार आहे, असे गोवा सरकारने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. हा मुद्दा सरकारने म्हादई पाणी तंटा लवादासमोरही मांडला आहे.कर्नाटक आणि गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचाच एक प्रवाह महाराष्ट्रातील विर्डी गावातील कट्टीका नाला येथून जातो. येथूनच प्रवाह उत्तर गोव्यातील वाळवंटी नदीपर्यंत येतो. वाळवंटी नदीवर अत्यंत महत्त्वाची अशी पाणीपुरवठा योजना चालते व या योजनेद्वारे उत्तर गोव्यातील ३५ गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. महाराष्ट्र सरकारची ८ धरणे बांधण्याची योजना प्रत्यक्षात आली तर वाळवंटीवरील पाणीपुरवठा योजना बंद पडेल व त्यासाठी महाराष्ट्राची योजना गोव्यातील ३५ गावांसाठी अत्यंत घातक ठरेल, असे अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांचेही म्हणणे आहे.कट्टीका नाल्यातून गोव्याला येणारे सगळे पाणी बंद करण्याची योजना महाराष्ट्राने आखली आहे. (पान २ वर)
‘विर्डी’मुळे ३५ गावांत जलदुर्भिक्ष!
By admin | Published: May 12, 2015 1:54 AM