आम्ही जे वचन देतो ते निभावतो, गृहमंत्री अमित शहांचा निर्धार

By आप्पा बुवा | Published: April 16, 2023 08:49 PM2023-04-16T20:49:48+5:302023-04-16T20:50:15+5:30

काँग्रेसच्या काळात लोकांना आपली कामे घेऊन सरकारी दरबारी हेलपाटे मारावे लागायचे. आज गोव्यात प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमांतर्गत आमदार मंत्री व सरकारी अधिकारी लोकांच्या दारात जाऊन सरकारी योजना लोकांना पुरवीत आहेत.

We keep what we promise, says Home Minister Amit Shah | आम्ही जे वचन देतो ते निभावतो, गृहमंत्री अमित शहांचा निर्धार

आम्ही जे वचन देतो ते निभावतो, गृहमंत्री अमित शहांचा निर्धार

googlenewsNext

फोंडा - खनिज व्यवसायावर गोव्यातील अनेक कुटुंबे विसंबून आहेत याची जाण सरकारला आहे. म्हणूनच आम्ही शब्द दिल्याप्रमाणे खनिज व्यवसाय सुरू करण्यासंबंधी हालचाली सुरू झालेल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री, खनिज मंत्री यांची पंतप्रधान सोबत झालेल्या बैठकीत खनिज व्यवसायासंबंधी ठोस निर्णय झाला आहे व खनिज व्यवसाय सुरू करण्याचे विविध टप्पे कधीचेच पूर्णत्वास आले आहेत. एका वर्षाच्या आत पूर्णपणे खनिज व्यवसाय गोव्यात सुरू होईल. अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

अमित शहा पुढे म्हणाले की' राज्य मोठे असो किंवा लहान भाजप पक्ष कधीच तिथल्या जनतेला गृहीत धरून चालत नाही. जेवढे महत्त्व मोठ्या राज्यांना आहे तेवढेच महत्त्व लहान राजांना सुद्धा आहे  हा मलमूत्र घेऊन भाजप काम करत असते.  या उलट काँग्रेस मात्र छोटा राज्याना गृहीत धरते. उत्तर पूर्व भागातील तिन राज्यात भाजपला जे यश मिळाले ते ह्या सिद्धांतामुळेच मिळाले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. खरे तर ती यात्रा त्यांचे कुटुंब व घराणेशाही सांभाळण्यासाठी काढलेली यात्रा होती. भारत जोडो यात्रेतून काँग्रेसमधील भारतभरचे नेते हवेत उडत होते. त्यांना वाटत होते की भारत जोडो यात्रेमुळे भारतभर काँग्रेसचे सत्ता येईल. परंतु यात्रेनंतर लगेचच झालेल्या उत्तर पूर्व राज्यांमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले तर भाजप तिथे संपूर्णपणे सत्तेत आलेला आहे.

ज्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी गोव्याला फक्त 432 कोटी निधी मिळायचा. आज भाजप सरकार मुळे गोव्याला प्रत्येक वर्षी 3000 कोटी विकास कामासाठी मिळत आहेत. म्हणूनच आज गोव्याचा चौफेर विकास होताना दिसत आहे. शेजारील कर्नाटक राज्यात सुद्धा भाजपने कधीच निधी कमी पडू दिला नाही . त्यामुळेच कर्नाटकातील जनतेचा सुद्धा भाजप वरील विश्वास वाढलेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटक मध्ये सुद्धा बहुमताने भाजप सरकार स्थापन होणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक करताना अमित शहा म्हणाले की स्थिर शासन हे स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. आज आपल्या कार्य कुशलतेमुळे प्रमोद सावंत यांनी गोव्यात स्थिर प्रशासन दिले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली गोव्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. आज गोव्यात औषधाला सुध्दा विरोधक राहिलेला नाही. हा जसा लोकांचा विश्वास भाजपवर आहे तसाच गोव्यातील प्रत्येक आमदार मंत्री यांनी केलेल्या कामाचा तो परिपाठ आहे .

काँग्रेसच्या काळात लोकांना आपली कामे घेऊन सरकारी दरबारी हेलपाटे मारावे लागायचे. आज गोव्यात प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमांतर्गत आमदार मंत्री व सरकारी अधिकारी लोकांच्या दारात जाऊन सरकारी योजना लोकांना पुरवीत आहेत. अशामुळेच आज भाजप सरकार वरील गोमंतकियांचा विश्वास वाढीस लागलेला आहे. गोव्यात चांगले नेते निर्माण होत आहेत हे यापूर्वी सुद्धा सिद्ध झाले आहे. मनोहर पर्रीकर हे छोट्याशा राज्यातून आले परंतु आज संपूर्ण भारताला त्यांच्याबद्दल गौरव आहे. छोट्या राज्यातील माणूस सुद्धा काय करू शकतो हे आपल्या छोट्याशा कार्यकाळात संरक्षण मंत्री म्हणून पर्रीकरानी दाखवून दिले आहे. पर्रीकरांचे स्वप्न पूर्ण करताना दोन्ही जागा यावेळी नरेंद्र मोदी यांना द्याव्यात.

गोमंतकाकडे केंद्राचे लक्ष आहे. म्हणूनच सुमारे 27 हजार कोटी खर्च होऊन येथे साधन सुविधांची निर्मिती होत आहे. पर्यटन असो, नवे पूल असो, नवे रस्ते असो ,विमानतळ असो आज प्रत्येक क्षेत्रात गोवा अग्रेसर बनत चालला आहे .काँग्रेस परिवारांचा विकास करते तर भाजप राज्यांचा व सामान्य जनतेचा विकास करते हे प्रत्येक मतदाराने लक्षात ठेवायला हवे. भ्रष्टाचाराची कीड अख्या देशाला लागली होती. ह्या किडीचे समूळ उच्चाटन करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जिथे जिथे भाजपची सत्ता आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची उदाहरणे घालून दिली आहेत.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे ही देशाची गरज आहे.  एकेकाळी भारताचे नाव घेताना जगातील लोकांची काय मानसिकता होती ह्याची आठवण करून बघा. आज भारत व भारतीय लोकांची नावे घेताना जगातील लोक अभिमानाने  नाव घेत आहेत.  आर्थिक क्षेत्रात सुद्धा देश घोडदौड करत असून आज अकराव्या नंबर वरून पाचव्या नंबर पर्यंत आम्ही मजल मारली आहे.  विकासाने परिपक्व असे जे देश होते त्या सर्व देशाला मागे टाकण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नीतीने केले आहे. म्हणूनच भारतीयांची मान पुन्हा एकदा जगभरात उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी दोन्ही जागा आम्हाला द्या. मागच्यावेळी दक्षिण गोव्याची जागा अवघ्या मतानी गेली होती. ती जागा यावेळी चांगल्या मताधिक्याने निवडून द्या व मोदींच्या हात बळकट करा.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले की 'अमित शहाजी यांनी निश्चिंत रहावे .गोमंतकातील जनता भाजपच्या कार्यपद्धतीवर खुश आहे. डबल इंजिन सरकारची ताकद जनतेला कळून चुकली आहे. अंत्योदय तत्वावर काम करताना योजनेसाठी पैसा कुठे कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत .इतर राज्यांची तुलना करता साधन सुविधाच्या बाबतीत आम्ही नवे मापदंड उभे करत आहोत. गोव्यात जिकडे तिकडे तुम्हाला विकास कामांची अनेक उदाहरणे उभी राहताना दिसतील. जनता खुष आहे म्हणूनच आम्ही अमितजी शहा यांना आश्वस्त करूतो  की लोकसभेच्या  दोन्ही जागा आम्ही देऊ. तुम्ही भ्यायची गरज नाही.(भिवपाची गरज ना).केंद्र सरकारचे गोव्यावर अनेक उपकार आहेत. गोव्याला निधी देताना केंद्र सरकार कधीच हात आखडता घेत नाही. केन्द्र खात्यातील प्रवेश परीक्षेसाठी कोकणी भाषेची मुभा देऊन सरकारने गोव्यातील युवकावर उपकार केले आहेत. गोव्यातील युवक हे कधीही विसरणार नाहीत. 

Web Title: We keep what we promise, says Home Minister Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.