शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
4
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
5
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
6
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
7
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
9
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
10
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
11
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
12
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
13
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
15
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
16
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
17
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
18
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
20
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

वीकेंड आला, गोव्याला चला! कोकण रेल्वेची विशेष गाड्यांची व्यवस्था; गर्दी टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 9:43 AM

कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार या रेल्वेगाड्या, वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बहुतांशी गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यातच या वीकेंडला सलग सुट्या आहेत. त्यामुळे विविध मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १५ ते १७ ऑगस्ट या वीकेंडसाठी कोकण रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहे. 

वीकेंड एन्जाॅय करण्यासाठी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. उपलब्ध गाड्यांत प्रवाशांची अतिरिक्त गर्दीची शक्यता आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनल - मडगाव जंक्शन (०११४९) ही विशेष गाडी १५ ते १७ ऑगस्टदरम्यान चालविली जाणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून रात्री ९ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मडगाव जंक्शवर पोहोचेल.

या गाड्यांना इथे आहेत थांबे...

परतीच्या प्रवासासाठी १६ ते १८ ऑगस्टदरम्यान मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक टर्मिनल (०११५०) ही विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनलला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड तसेच थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :goaगोवाKonkan Railwayकोकण रेल्वे