लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ऑनलाईन बाजारपेठीला कितीही विरोध केला तरी या गोष्टी आता टाळण्याच्या पलिकडे आहेत. इंटरनेटच्या युगात ऑनलाईन खरेदीला पर्याय नाही. ज्या गोष्टी स्थानिक बाजारात मिळत नाहीत, किंवा त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागते अशा वस्तु तरी मिळविण्यासाठी ऑनलाईनचा योग्य पर्याय आहे. परंतु ही खरेदी करताना आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे जाणून घेतले नाही तर आपण अडचणीत सापडू शकता. इंटरनेटवर शॉपिंगच्या नावाने फसव्या वेबाईट्सचा सुळसुळाट आहे. त्यामध्ये फसायचे नसल्यास वेबसाईटच्या अँड्रेसबारच्या (पॅडलॉकवर) डावीकडे क्लिक करा. तिथे साईटप्रमाणपत्राची माहिती आहे तर ती अधिकृत वेबसाईट, ती नसेल तर त्या वेबसाईटचा नाद सोडा.
काही चूक झाली तर काय करावे
खरेदीत एखादी चूक राहून गेली तर ती दुरुस्त करण्याच्य संधी असतात. अधिकृत वेबसाईटवरून हेल्पलाईन क्रमांकवरून ग्राहक सेवेसी संपर्क साधा. चुकीची दुरुस्ती करण्यसाठी प्रक्रिया विचारून ती पार पाडा. तुमचे कार्ड फसवे रीतीने वापरले गेले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमच्या बँकेला ताबडतोब कळवा.
ग्राहकाचे अधिकार व रिटर्न पॉलिसी
खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाचे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण उत्पादन खराब मिळाले तर ते त्वरित परत करण्याचा हक्क विलंब केल्यास गमावून बसू शकता. शिवाय आर्थिक ट्रान्सेक्शन्स व इतर माहितीही अगोदर घ्या.
सुरक्षेसाठी
डिवाईस सॉफ्टवेअर आणि व्हायरस संरक्षण अद्ययावत ठेवा.ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरा. सार्वजनिक वाय-फाय वापरु नका. शक्यतो क्रेडिट कार्ड वापरा.
स्वस्त खरेदीसाठी हे करा
संयम बाळगा. डिस्काउंट कुपन वापरा. शिपिंग चार्ज टाळण्यासाठी एकाच वेळी अधिक वस्तुंची खरेदी करा. किमतींची तुलना करा. विशेष ऑफरची प्रतीक्षा करा. वेबसाईट मेंबरशीप घ्या.