ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर भाजपा सत्तेत होती. पण तिथे दोन्ही पक्ष दणकून मार खातील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एकाला बहुमत मिळेल, असे हे पोल सांगतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाला ११0 ते १६९च्या दरम्यान जागा मिळतील, असे हे पोल म्हणतात. तिथे भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील, असे या सर्व्हेवरून दिसते. केवळ एकाच पोलमध्ये तिथे भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी अन्य पोलनुसार भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, पण बहुमत मात्र मिळणार नाही, असे दिसते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तो पक्ष तिथे मागे पडेल, असे पोल सांगतात. म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर ईशान्येकडील आणखी एका राज्यात भाजपा शिरकाव करेल.
एक नजर 5 राज्यांतील एक्झिट पोलवर-
उत्तर प्रदेश-
- टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता, समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा .
- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला 164-176 जागा, सपा-काँग्रेसला 156-169 जागा , बसपला 60-72 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला 185 जागा , समाजवादी पक्षाला 120 जागा आणि बसपाला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
मणिपूर-
- टाइम्स नाऊ व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये 60 जागांपैकी भाजपाला 25 ते 31, काँग्रेसला 17 ते 23 आणि इतर पक्ष व अपक्षांना 9 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज.
- इंडिया टीव्ही-सी.व्होटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपा 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अन्य पक्षांना 12 पर्यंत जागा मिळू शकतात.
-न्यूज 24- भाजपाला 25 ते 31 जागा, काँग्रेसला 17 ते 23 जागा, इतरांना 09 ते 15 जागा
पंजाब-
- आज तक आणि सीसेरो यांच्या एक्झिट पोलमधून पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा आघाडीला फक्त 4 ते 7 जागा, काँग्रेसला 62 ते 71 जागा मिळण्याचा अंदाज तर अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला 42 ते 51 जागा
- इंडिया टीव्ही आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनं पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपा + अकाली दल 9, काँग्रेस 45, तर आम आदमी पार्टीला 63 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज
-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार कॉंग्रेसला 60 जागा, आम आदमी पार्टीला 60 जागा तर अकाली दल आणि भाजपा आघाडीला 6 जागा
- इंडिया न्यूज एक्झिट पोलनुसार कॉंग्रेसला 55 जागा, आम आदमी पार्टीला 55 जागा तर अकाली दल आणि भाजपा आघाडीला 7 जागा
उत्तराखंड-
- इंडिया टुडे आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कांटे की लढत झाल्याचे सांगितले आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.
-इंडिया टीव्ही आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळतील असा अंदाज
न्यूज-24 आणि टुडेज चाणक्य- 53 जागा मिळवून भाजपाचे सत्तेत पुनरागमन करेल तर कॉंग्रेसला 15 जागा मिळण्याचा अंदाज
गोवा-
-इंडिया टीवी सी. वोटरच्या अंदाजानुसार गोव्यामध्ये भाजपाला 15 ते 21, काँग्रेसला 12 ते 18 आणि आम आदमी पक्षाला 4 जागा मिळतील असा अंदाज अन्य पक्षांना 2 ते 8 जागा
-टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये 40 जागांपैकी भाजपाला 18 जागा, कॉंग्रेस 15 जागा आणि आम आदमी पार्टीला 2 तर इतरांना 5 जागा मिळण्याचा अंदाज.