पणजी : आमच्या बार्देश तालुक्यातील किमान दोन-तीन मतदारसंघांतील लोक पाण्याच्या प्रश्नावरून संतप्त झालेले आहेत. वारंवार नळ कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली की, लोक संतप्त होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला शॉक ऑब्जर्वरची भूमिका पार पाडावी लागते, असे साळगाव मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी मंगळवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
मंत्री साळगावकर म्हणाले, की बांधकाम खात्याने काही अभियंते, अटेंडंट्स यांची बदली करायला हवी. आमचे भाग पर्यटन व्यवसायाच्या पट्टयात येतात. तेथे घरांमध्ये, फ्लॅट, गेस्ट हाऊस व अन्यत्र पाणी नियमितपणो पोहचत नाही. जलवाहिन्यांमध्ये झाडांची मुळे घुसलेली आहेत. जलवाहिन्या साफ करण्याचे काम संबंधित कर्मचारी वर्गाने व अभियंत्यांनी करुन घ्यायला हवे. पाणी आले नाही की लोक संतप्त बनतात व मग आम्हाला जलवाहिन्यांकडे उभे राहून काम करून घ्यावे लागते. आम्ही ही स्थिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनाही सांगितली आहे.
पुढे बोलताना साळगावकर म्हणाले, की लोकांचा संताप सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांर्पयत पोहचत नाही, आमच्यार्पयत पोहचतो. म्हणून आम्ही शॉक ऑब्जर्वर झालेलो आहोत. गणोशोत्सवाच्या काळातही लोकांना पाण्याचा पुरवठा झाला नाही. किती काळ म्हणून पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून लोकांना वंचित रहावे लागेल, असा प्रश्न येतो. कळंगुटमध्ये जेव्हा पम्पची व्यवस्था नव्हती तेव्हा साळगावच्या वाट्याचे पाणी कळंगुटसाठी वळविले गेले. आग्नेल फर्नाडिस तेव्हा कळंगुटचे आमदार होते. आता कळंगुटमध्ये पम्पची व्यवस्था आहे. त्यामुळे कळंगुटला साळगावच्या वाट्याचे पाणी न पोहचविता ते साळगावसाठीच दिले जावे. माङ्यासह महसुल मंत्री रोहन खंवटे यांनीही मंत्री ढवळीकर यांच्यासमोर स्थिती मांडली आहे. साळगावमध्ये मी व मंत्री खंवटे यांना शॉक ऑब्जर्वर व्हावे लागले.