शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

दोन हजार पत्रकार जमतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 10:32 PM

कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.

- राजू नायककर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.कर्नाटक हे प्रगतीशील राज्य आहे. तेथील वृत्तपत्रसृष्टीही समृद्ध आहे. परंतु, एका अधिवेशनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार जमणे हा विक्रमच म्हणावा लागेल. देशात अनेक मोठी राज्ये आहेत. त्यांचीही एवढी मोठी अधिवेशने होत नाहीत. कर्नाटकातील अधिवेशनासाठी गोव्यातून मी व श्रीलंका व नेपाळचाही प्रत्येकी एक प्रतिनिधी आला होता.मी माझ्या भाषणात पत्रकारांचा महासंघ बनविण्याची आवश्यकता मांडली. गोव्यासह पश्चिम व दक्षिण राज्यांचे परस्परांशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, त्यावर नेते खल करतातच; परंतु पत्रकारांनाही भूमिका मांडण्यासाठी परस्पर सौहार्दाने काम करता आले पाहिजे. म्हादईचा प्रश्न आहे. गोवा व कर्नाटकने या बाबतीत अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. कर्नाटकात तर हिंसाचाराची भाषा केली जाते. गोव्यासारख्या चिमुकल्या राज्याने या प्रश्नावरील कायदेशीर बाबींवरच १० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. वास्तविक दोन्ही राज्यांमधील पत्रकार एकत्र येऊन परिस्थितीचे तटस्थ अवलोकन करू शकतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, केरळला ग्रासणारा प्रश्न आहे तो पश्चिम घाटांच्या संवर्धनाचा. केरळमध्ये गेल्या पावसाळ्यात प्रलय येऊन जो हाहा:कार निर्माण झाला त्याला केरळ राज्याने पश्चिम घाटांवर केलेली कुरघोडी कारण झाली. केरळने वारेमाप धरणे बांधली व पश्चिम घाटांना वेसण घालण्याचा जो प्रयत्न केला तो अश्लाघ्य होता, असे आता सांगितले जाते.पत्रकार अभिनिवेशाने आपल्याच राज्याची भूमिका पुढे दामटतात. विस्तृत भूमिका मांडली जात नाही. पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत तर असा अभिनिवेश योग्य नाही. दुर्दैवाने पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांना विषयाची जाणीव करून दिली तरी खूप काही होऊ शकेल.म्हैसूर अधिवेशनात पत्रकारांसाठी आचारसंहिता, वेतनवाढ, पत्रकार भवन आदींची चर्चाही झाली. कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रचारी थाटाचे भाषण केले. पत्रकारांची नेतेमंडळी राजकारण्यांचा अनुनय करीत होती, ते खटकले; परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची उपस्थिती आणि त्यांचा चर्चेतील सहभाग वैशिष्ट्यपूर्ण आणि दिलासादायक होता. कर्नाटकातील प्रमुख वृत्तपत्रे चार-पाचच आहेत, त्यातही कानडी वृत्तपत्रे अग्रेसर आहेत; परंतु प्रत्येक जिल्ह्यात तीन-चार कानडी वृत्तपत्रे निघतात आणि ती दमदारपणे वाचकांवर गारुड घालून आहेत, हे चित्र निश्चित आम्हा पत्रकारांसाठी अभिमानास्पद होते.

टॅग्स :Mediaमाध्यमेKarnatakकर्नाटक