वासुदेव पागी, पणजीः गुजरात पोलिसांना जे जमले नाही ते काम गोवा पोलिसांनी करून दाखविले आहे. बलात्कार पीडीता असल्याचा बनाव करून गुजरातमध्ये ४ पोलीस स्थानकात तक्रारी नोंदवून लोकांना ब्लँकमेलिंग करून लाखो रुपये कमावणाऱ्या २ गुजराती युवती गुजरात पोलिसांना वेड्यात काढत होत्या. परंतु गोवा पोलिसांनी त्यांचे पितळ उघडे पाडून त्यांना पुराव्यासह पकडले.
सोशल मिडियाच्या माद्यमातून सावध हेरून त्यांना लक्ष्य बनविणे, त्यानंतर त्यांच्याशी सलगी करणे आणि नंतर बलात्कार केल्याचा आरोप करणे. त्याच्याकडे मोठ्या रक्कमेची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार नोंदविण्याची धमकी देणे अशी त्यांची मोडस ऑपरेन्डी होती. पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार करायच्या. तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात जाताना एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे आपले कपडे स्वत:च फाडून घेऊन खरोखऱ्च पीडीत युवती वाटाव्यात अशा पद्धतीने सर्व नाटके चालली होती. गुजरातमध्ये भल्या भल्यांना या पद्धतीने लुबाडून त्यांनी मोर्चा गोव्याकडे वळविला होता. त्याच नादात त्यांनी आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार कोलवाळ पोलिस स्थानकात केली, आणि तिथेच मोठी चूक करून बसल्या. कारण कोलवाळ पोलिसांनी केवळ त्यांच्या तक्रारीवर तपास न करता त्या युवतींचाही तपास केला आणि हा तपास त्यांना गुजरातमधील अनेक पोली स्थानकांपर्यंत घेऊन गेला जिथे याच युवती अशाच पद्धतीने पीडीता म्हणून तक्रार नोंदवून आल्या होत्या.
या युवतींचा इतिहास भुगोल तपासून त्यांची कुंडलीच बनवून शेवटी क ळंगूट पोलिसांकडून अटक करून हे प्रकरण संपविले. कोलवाळ पोलिसांच्या या यशामुळे त्यांचे कौतुक होत आहे. जे काम इतक्या साधन सुविधा असलेल्या गुजरात पोलीसांना जमले नाही ते काम गोवा पोलिसांनी करून दाखविले म्हणून गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग आणि अधीक्षक निधीन वालसान यांनी कोलवाळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांचे अभिनंदन केले आहे.