शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

...तेव्हा ‘भाभासुमं’ कुठे होता?

By admin | Published: August 09, 2015 1:05 AM

...तेव्हा ‘भाभासुमं’ कुठे होता?

पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंच नव्याने माध्यमप्रश्नी जे आंदोलन करत आहे, त्याला माझा पाठिंबा आहे; पण मी माध्यमप्रश्नी मातृभाषेच्या बाजूने भूमिका घेऊन आवाज उठवतो, या कारणास्तव कला अकादमी व मनोरंजन संस्थेवरून मला दोन वर्षांपूर्वी सरकारने काढले होते. त्या वेळी भाषा सुरक्षा मंच कुठे होता, असा प्रश्न भाजपचे आमदार विष्णू वाघ यांनी आता उपस्थित केला आहे. वाघ येथे शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आता लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री बनल्याने भाषा सुरक्षा मंच नव्याने आंदोलन करत असावा. त्या अर्थाने भाषा सुरक्षा मंचला उशिरा जाग आली आहे. मी माध्यमप्रश्नी बोलल्यामुळे मला सरकारने दोन पदांवरून हटविले होते, तेव्हा एकही ‘मायचा पुत’ पुढे आला नाही. आता पार्सेकर मुख्यमंत्री बनल्यानंतर मंचला तोंड फुटले. वाघ म्हणाले की, भाषा सुरक्षा मंचने यापूर्वी तडजोड करून माघार घेतली होती. मात्र, आता पुन्हा माघार न घेता निर्णायक भूमिका घ्यावी. माध्यम प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावूनच या मंचने शांत बसावे. तत्पूर्वी तडजोड करू नये. माझा पाठिंबा मंचला आहेच. डायोसेझनच्या सध्याच्या ज्या इंग्रजी शाळांना अनुदान मिळते, ते २०१६ सालच्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभापर्यंत सुरू राहावे. त्यानंतर मात्र सुरू राहू नये, अशी भाषा सुरक्षा मंचची भूमिका आहे. याबाबत जेव्हा विधानसभेत विधेयक येईल, तेव्हा मी माझी भूमिका मांडीन. आम्ही विधेयक विधानसभेत सादर होईल, असे म्हटले आहे; पण इंग्रजी समर्थकांना जसे विधेयक हवे, तसेच ते असेल किंवा आम्ही विधेयक त्यांना हवे तशा तरतुदी घालून संमत करू, असे मुळीच म्हटलेले नाही. (खास प्रतिनिधी)