शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

अटल सेतू बदनाम का? मनोहर पर्रीकर असते तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 4:05 PM

विरोधी आमदार त्याचे भांडवल करणारच. 

मंत्री गोविंद गावडे यांची गेले काही दिवस जोरदार कसरत सुरू आहे. त्यांना ती करावीच लागली, कारण विरोधकांनी व्यूहरचनाच अशी केलीय की मंत्री गावडे यांची स्थिती अभिमन्यूसारखी झाली आहे. गावडे यांना चक्रव्यूहात अडकवलेय ते आमदार विजय सरदेसाई यांनी. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळल्याने विरोधी आमदारांच्या हाती कोलीतच सापडले. विरोधी आमदार त्याचे भांडवल करणारच. 

मनोहर पर्रीकर आज विरोधी पक्षनेतेपदी असते तर कला अकादमीच्या विषयावरून त्यांनी संबंधित मुख्यमंत्र्यांना सळो की पळो करून सोडले असते. भाजप कार्यकर्त्यांनी कला अकादमीसमोर निदर्शने केली असती. आता विरोधी आमदारांनी विधानसभेत एखादी भानगड उघड केली तरी त्या अनुषंगाने बाहेर रस्त्यावर आमदारांचे कार्यकर्ते कोणतीच आंदोलनात्मक कृती करत नाहीत. त्यामुळेच सावंत मंत्रिमंडळाचे फावले आहे. सध्या सरकारमधील अनेक राजकारण्यांना वाटतेय की आपण सत्तेचा अमरपट्टाच घेऊन आलो आहोत. छोटया छोटया सरकारी सोहळ्यांवर प्रचंड उधळपट्टी सुरू आहे. कोट्यवधी रुपये केवळ सल्लागार कंपन्या व इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपन्यांवर खर्च केले जात आहेत. सनबर्नसारखा सोहळा एक इडीएम कंपनी दरवर्षी आयोजित करते. तो आयोजित करण्यापूर्वी सरकारमधील बहुतेकांना खुश केले जाते. मग होर्डिंगची कोट्यवधींची बिलेदेखील सरकारी पातळीवरून सहज मंजूर होतात.

मंत्री गावडे यांना वाटतेय की, त्यांना सरदेसाई व्यक्तिगतरीत्या टार्गेट करत आहेत. मनोहर पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्रिपदी होते तेव्हा २०१२ सालानंतर सरदेसाई वगैरे विरोधी आमदार पर्रीकर यांनादेखील शिंगावर घेण्याचा प्रयत्न करत होते. पर्रीकर यांना विविध मुद्दयांवरून सरदेसाई, रोहन खंवटे घेरत होते. सरकारी घोटाळ्यांच्या विषयावर पर्रीकरदेखील अडचणीत येत होते. किनारपट्टी स्वच्छतेचे कंत्राट याचे उत्तम उदाहरण आहे. खनिज खाणी नव्याने सुरू करण्यात पर्रीकरांना अपयश आले तेव्हाही विरोधी आमदारांच्या टीकेचे सर्वाधिक धनी तेच बनले होते. त्यामुळे आज कला अकादमीप्रश्नी आरोप झाले म्हणून गावडे यांनी आपल्यालाच टार्गेट केले जाते असे म्हणणे पटण्यासारखे नाही. बहुजन समाजाचा आपण आवाज असल्याने आपल्याला लक्ष्य केले जाते, असा दावा करणे हे तर हास्यास्पद वाटते. कोणताच राजकारणी हा कधी बहुजनांचा आवाज वगैरे नसतो. गरिबांवर मूक आणि बधिर होण्याची वेळ आलीय, अशा काळात आपण सगळेच वावरतोय.

आता मुद्दा राहिला अटल सेतूचा. पणजीतली वाहतूक कोंडी कमी करण्याच्या विचाराने पर्रीकर यांनी हा पूल बांधून घेतला. देशातील नामांकित कंत्राटदार कंपनीने तो उभा केला. या पुलावरील रस्त्यांवर सुरुवातीपासून प्रचंड खड्डे पडले. सातशे-आठशे कोटी रुपये खर्च करूनही पुलाला लगेच खड्डे पडतात हा प्रकार संताप आणणाराच ठरला. यामुळे अटल सेतूच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेससह अन्य काही विरोधी पक्षांनी सातत्याने केलाच, पर्रीकर आज हयात असते तर त्यांनी खड्डे पडण्यामागचे कारण शोधण्यास तज्ज्ञ मंडळींना भाग पाडले असते. सध्याच्या सरकारने लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष कष्ट घेतले नाहीत. 

मंत्री गावडे यांनी कला अकादमीच्या कामाचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात परवाच अटल सेतूचे उदाहरण मीडियाला दिले. अटल सेतूविषयी खूप काही झाले; पण त्यावर कुणी घोटाळ्याचा आरोप केला नाही, माझ्या कला अकादमीविषयी मात्र घोटाळ्यांचा आरोप केला जातो, असे गावडे बोलले. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आपले विधान थोडे बदलले व आपण अटल सेतूचा संबंध भ्रष्टाचाराशी लावला नव्हता असा दावा केला. अर्थात गोमंतकीयांना काय कळायचे ते कळलेच. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळले, अटल सेतू कोसळला नाही, हे गावडे यांना लक्षात घ्यावे लागेल. पन्नास कोटी रुपये कला अकादमीवर खर्च झाले. आता तरी ती संस्था सावरायला हवी. त्याऐवजी अटल सेतूकडे बोट दाखविण्यात काही अर्थ नाही.

टॅग्स :goaगोवा