पणजी : खाणी बंद करण्यासाठी कट कारस्थानाबाबत इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या आरोपांना अजूनपर्यंत कोणीच का उत्तर दिलेले नाही? हे आरोप खरे मानावेत का?, असा प्रश्न समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत त्यांनी विरियातो यांची व्हायरल ॲाडिओ क्लीपही वाजवून दाखवली. फळदेसाई म्हणाले की, विरियातो यांनी अजून या क्लीपमधील आवाज आपला नाही, असे म्हटलेले नाही. कटकारस्थानासाठी ज्यांच्या घरी बैठक झाली असा आरोप केला आहे ते गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनीही अजून काही स्पष्टीकरण दिलेले नाही. कॉंग्रेसचे माजी मंत्री ज्योकीम आलेमांव यांच्याकडूनही खुलासा झालेला नाही. या ॲाडियो क्लीपमध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार त्यावेळी मंत्री ज्योकीम आलेमांव, विजय सरदेसाई यांनीच पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना त्यावेळी सुप्रिम कोर्टात जाण्यासाठी त्यांनीच पुढे काढले व खाणी बंदचा आदेश कोर्टाकडून आणला.’ प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी पाहून कॉंग्रेस भयभीत झाला आहे.
मोदीजी गोव्याबद्दल काही बोलले नाहीत, या विरोधकांच्य टिकेचा समाचार घेताना ते म्हणाले कि,‘ झुवारीवरील नवीन पुलापासून मोपा विमानतळापर्यत सर्व गोष्टींचा उल्लेख मोदीजींनी केला. कोविड काळात पर्यटनस्थळ म्हणून गोव्याला प्राधान्यक्रमे लस उपलब्ध केली. कॉग्रेसची दुटप्पी भूमिकाही त्यांनी उघडी पाडली. महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बांदोडकर यांनी मोदीजींच्या सभेला लोकांनी आपणहून मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सभा यशस्वी केली. जनतेने मोदींप्रती विश्वास दाखवल्याचे त्या म्हणाल्या.