लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीत मंत्री, आमदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या मताधिक्याचे लक्ष्य ठेवले होते; परंतु बरेचजण यात कमी पडल्याचे निकालानंतर दिसून आले. भाजपने सुरुवातीपासून दक्षिण गोव्यात आपली सर्व ताकद लावली होती. मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेत ठाणच मांडले होते. तरीही पल्लवी धेपेंचा पराभव झाल्याने हा धक्का भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. उत्तरेतही काही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे मताधिक्य घटले आहे.
कुंभारजुवेत भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना १३ हजारांपेक्षा जास्त मते मिळतील, असे स्थानिक आमदार राजेश फळदेसाई छातीठोकपणे सांगत होते. अल्पसंख्याकांनीही भाजपला मते दिल्याचे त्यांचे म्हणणे होते; परंतु प्रत्यक्षात ९,४१६ मतेच मिळाली.
सांताक्रूझमध्ये आमदार रुडॉल्फ फर्नांडिस अगदीच कमी पडले. या मतदारसंघात श्रीपाद यांच्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांना १९५८ मते जास्त मिळाली. खलप यांना ९,९४३ तर श्रीपाद यांना ८,९८५ मते मिळाली. रुडॉल्फ हे काँग्रेसमधून फुटून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे श्रीपाद यांना अधिकाधिक मते मिळवून देण्यासाठी त्यांची खरंतर परीक्षाच होती.
ताळगावमध्ये मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. जेनिफर भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असतात; परंतु अपेक्षेएवढे मताधिक्य त्या श्रीपादना देऊ शकल्या नाहीत. केवळ २,०७१ मतांची आघाडी येथे भाजपला मिळाली. श्रीपाद यांना ११,२०९ तर खलप यांना ९,१३८ मते च्या लोकसभा निवडणुकीवेळी २ मिळाली. २०१९ बाबूश मोन्सेरात व जेनिफर काँग्रेसमध्ये होत्या. ताळगावात त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार गिरीश चोडणकर यांना १०,९०६ मते मिळाली होती.
फळदेसाईंचे लक्ष्य हुकले
कुंभारजुवेत फळदेसाई अपेक्षित मते मिळवून देऊ शकले नाहीत. काँग्रेसला येथे ९,०८४ मते मिळाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे ९,८४५ मते मिळाली होती. यावेळी प्रत्यक्षात ४२९ मते घटली, फळदेसाई यांनी आपली सर्व यंत्रणा भाजपसाठी लावली होती. श्रीपाद यांचे पुत्र सिद्धेश हे खोर्ली जिल्हा पंचायतीचे झेडपी तथा उत्तर जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष आहेत. श्रीपाद यांच्यासाठी त्यांनीही प्रचार काम केले होते; परंतु या मतदारसंघात भाजपला १३२३ एवढीच आघाडी मिळाली. ख्रिस्ती मतदारांची मते फळदेसाई आणू शकले नाहीत.
सिक्वेरा मंत्री असूनही नाकारले
भाजपने काब्राल यांना हटवून आलेक्स सिक्वेरा यांच्या रुपाने नुवेला मंत्रिपद दिले, मात्र आलेक्स सिक्वेरा नुवेतूनच मते मिळवून देऊ शकले नाहीत. काँग्रेसला या मतदारसंघात तब्बल १६,३६५ मते मिळाली, तर भाजपला फक्त २,६७७ मतांवरच समाधान मानावे लागले. हे मताधिक्य तब्बल १३.६८८ एवढे आहे. सिक्वेरा यांनी केलेला भाजप प्रवेश स्थानिक मतदारांना मानवलेला नाही. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळालेली मते पल्लवी यांच्याकडे वळविण्यात सिक्वेरा अपयशी ठरले.
काँग्रेसची मते कुडाळीत मते कुठ्ठाळीत वाढली
कुठ्ठाळीतही काँग्रेसची मते २,५०२ नी वाढली, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना ९८७५ मते मिळाली होती. आता विरियातो यांना तब्बल १२,३७७ मते मिळाली आहेत. भाजपला २०१९ च्या निवडणुकीत ९७९१ मते मिळाली होती. ती कमी होऊन ९४४५ वर आली. या मतदारसंघाचे अपक्ष आमदार आंतोन वास भाजपसोबत सत्तेत आहेत. सत्ताधारी आमदार असूनही ते मते मिळवून देऊ शकले नाहीत किंवा फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली मते पल्लवी यांच्याकडे वळवू शकले या मतदारसंघात काँग्रेसचे नाहीत.
उल्हास तुयेकरांसाठी मोठा धक्का
दक्षिण गोव्यात नावेलीचे भाजप आमदार उल्हास तुयेकर हे पल्लवी धेंपे यांना मते मिळवून देण्यास अपयशी ठरले. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नाडिस यांना या मतदारसंघात भाजपपेक्षा तब्बल ५ हजार ७७० मते जास्त मिळाली. विरियातो फर्नाडिस यांना या मतदारसंघात एकूण मते १२ हजार ९२१, तर भाजपच्या उमेदवार पल्लवी धेपे यांना केवळ ७ हजार १५१ मते मिळाली. आमदार उल्हास तुयेकर यांच्यासाठी विरियातोंना मिळालेले मताधिक्क्य सर्वांत मोठा धक्का ठरला आहे.