- विलास ओहाळपणजी - महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते काम करण्यास तयार आहेत. यापूर्वी असा प्रयत्न झाला होता, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आता गट-तट विसरून एकत्र येण्याची ही काळाची गरज बनली आहे, असे मत आरपीआयचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा राज्याचे प्रभारी सुरेश बारशिंगे यांनी व्यक्त केले. गोवा राज्य प्रदेश कार्यकारिणी निवडीसाठी ते बारशिंगे गोव्यात आले आहेत. त्यावेळी महाराष्ट्रीतील पक्षाच्या कामाविषयी आणि भवितव्याविषयी त्यांच्याशी ‘लोकमत’ने वार्तालाप केला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी घनश्याम चीमलकर, बाळासाहेब बनसोडे यांची उपस्थिती होती.
कोपर्डी बलात्कारानंतर मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे निघाले त्यातून जातीय तेढ निर्माण झाली नसल्याचे आपणास वाटते, असे सांगत बारशिंगे म्हणाले की, मोर्चा काढण्याचा त्यांचा अधिकार आहे. मराठा आणि ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे, ती रास्तच आहे. आम्ही त्यांच्या आड येणार नाही, पण आमच्या आरक्षणाच्या टक्केवारीला हात न लावता त्यांना आरक्षण द्यावे. या दोन्ही समाजात अनेक गरीब कुटुंब आहेत, हे मान्यच करावे लागेल. आर्थिक आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण ज्यांची ही मागणी आहे त्यांनी अगोदर आंतरजातीय विवाह स्वीकारायला हवा. आंतरजातीय विवाह झाल्यास जात-धर्माचा वाद संपुष्टात येणार आहे.
रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष सर्व जाती-धर्माच्या लोकांना पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यापूर्वी हा प्रयत्न झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षातर्फे मायावतींनी केलेला सोशल इंजिनियरिंगचा प्रयत्न यशस्वी झाला. आमचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा असेल. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखील रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आल्यास मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. त्यासाठी आठवले हे स्वत: तयार आहेत, तसा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले.
आठवले 24 जानेवारीला गोव्यातकेंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 24 जानेवारी रोजी गोव्यात येणार आहेत. यावेळी ते समाजकल्याण खात्याचे मंत्री, अधिकारी वर्गाची भेट घेणार आहेत. येथील समाजकल्याण खात्याचे प्रश्न सोडविण्याबाबत ते चर्चा करतील. तसेच राज्यात पक्ष वाढीसाठी कार्यकारिणीला मार्गदर्शन आणि पणजीत कार्यकत्र्याचा मेळावाही ते घेणार आहेत.