लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण: गेल्या दहा वर्षांत पेडणे ते काणकोणपर्यंत मोठा विकास झाला. जे ५० वर्षात काँग्रेस सरकारला शक्य झाले नाही, ते १० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने करून दाखविले. दक्षिण गोव्याची लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांना मत दिल्याने ते मोदींना मिळणार. तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताचे श्रेय हे वेगवेगळ्या नेत्यांना न जाता ते पूर्णतः काणकोणवासीयांना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
काणकोणचे माजी आमदार तथा गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून ६ हजारपेक्षा अधिक मते घेतलेल्या इजिदोर फर्नांडिस यांनी धुल्लगाळ येथील खुल्या सभागृहात बोलावलेल्या आपल्या समर्थकांच्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उमेदवार पल्लवी धेंपे, इजिदोर फर्नाडिस उपस्थित होते. धर्म निरपेक्ष याचा अर्थ बऱ्याचजणांना माहीत नाही, भाजप सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना या सर्वांसाठी असून गोव्यात १ लाख ३७ हजार गृहिणी गृहआधार योजनेचा लाभ घेत आहेत, असे सांगून यापुढे गरिबांना रेशनवरील तांदूळ मिळतो. वापुढे तो घरपोच दिला जाईल, असे ते म्हणाले, इजिदोर समर्थकांच्या ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी येत्या तीन महिन्यांत पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस जाती, धर्माच्या नावावर राजकारण करीत असून भाजपा विकासाच्या नावावर राजकारण करीत आहे. इजिदोर फर्नाडिस हे गेली दोन वर्षे राजकारणापासून अलिप्त राहूनसुद्धा त्यांनी एका दिवसांत आपल्या समर्थकांची एवढी मोठी सभा घडवून आणली, याचा उल्लेख करून त्यांनी इजिदोर यांचे कौतुक केले.
यावेळी उमेदवार पल्लवी धेपे यांनी सांगितले की, इजिदोर व धेपे कुटुंबीयांचे गेल्या ३५ वर्षांपासून कौटुंबीक संबंध आहेत. थेंपे परिवारातर्फे करण्यात येणाऱ्या विकासकामांसंबंधी, शैक्षणिक साधन सुविधांची त्यानी माहिती देतानाच आपल्याला दिलेले मत हे मोदींसाठी असेल असे सांगितले.
सांगितले की, काणकोणवासीयांना ३०० नोकऱ्या द्या, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मतदारसंघातील मताधिक्क्य कार्यकत्यांच्या बळावर वाढवले जाईल, असे ते म्हणाले. या सभेत गावडोंगरीचे सरपंच धिल्लन देसाई, नगरसेवक शुभम कोमरपंत, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष नंदिप भगत व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांना संतोषी आंगडीकर, शोभना वेळीप व प्रणाली प्रभुगावकर यांनी पुष्पगुच्छ प्रदान केले, सूत्रसंचालन सुनय कोमरपंत यांनी केले. सूरज कोमरपंत यानी आभार मानले.