लोकमत न्यूज नेटवर्कपंकज शेट्ये / वास्को: पर्यावरणाचे हीत जपून मुरगाव बंदरात विविध मालाची क्षमता कशा प्रकारे वाढवावी याच्यावर भविष्यात भर देण्यात येणार आहे. मुरगाव बंदराचे आर्थिक बळ वाढवण्याबरोबरच मुरगाव बंदराची उज्वलता पूर्वी सारखी वाढवण्यासाठी भविष्यात विविध पावले उचलण्यात येतील. मुरगाव बंदराचा विकास करण्याबरोबरच समाजाच्या आणि गोमंतकीयांच्या हीतासाठी भविष्यात विविध पावले उचलण्यात येणार असल्याचे ‘मुरगाव पोर्ट अथोरेटी’ नवनिर्वाचित चेअरमन डॉ. एन विनोदकुमार यांनी सांगितले.
मुरगाव पोर्ट अथोरेटीचे नवीन चेअरमन म्हणून डॉ. विनोदकुमार यांनी नुकताच ताबा घेतल्यानंतर त्यांनी काही पत्रकारांशी वार्तालाप केला. ‘मुरगाव पोर्ट अथोरेटी’ चा चेअरमन म्हणून मला मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी नवीन असल्याने प्रथम मी मुरगाव बंदरातील कामकाज, येथील व्यवसाय - व्यवहार आणि इतर सर्व गोष्टी योग्यरित्या जाणून घेणार असल्याचे सांगितले. सर्व बंदरांची मालमत्ता आणि त्यांचे बळ मोठे असत असून मुरगाव बंदराच्या मालमत्तेची आणि बळाचा योग्यरित्या कशाप्रकारे फायदा करून घ्यावा त्यावर भविष्यात भर दिली जाणार आहे. पर्यावरणाचे हीत जपून मुरगाव बंदरात विविध प्रकारचा माल वाढवण्यासाठी भविष्यात भर दिली जाणार असल्याचे डॉ. एन विनोदकुमार यांनी सांगितले. मुरगाव बंदराचे आर्थिक बळ वाढवण्याबरोबरच बंदराची पूर्वीसारखी उज्वलता पुन्हा आणण्यासाठी भविष्यात विविध पावले उचलण्यात येणार आहेत. मुरगाव बंदराचा विकास करण्याबरोबरच गोमंतकीयांच्या, येथील समाजाच्या हीतासाठी भविष्यात ‘मुरगाव पोर्ट अथोरेटी’ तर्फे पुढाकार घेण्याबरोबरच रोजगाराची संधी वाढवण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले.
यापूर्वी मला गोव्यात सेवा बजावण्याची संधी मिळालेली आहे. २०१७ ते २०२१ ह्या काळात मी गोव्यात ‘पोस्ट मास्टर जनरल’ म्हणून नियुक्त असल्याची माहीती डॉ. एन विनोदकुमार यांनी दिली. त्यावेळी गोव्याबरोबरच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर असल्याची माहीती त्यांनी दिली. ‘पोस्ट मास्टर जनरल’ म्हणून गोव्यात सेवेत नियुक्त असताना मी संपूर्ण गोवा फीरून पाहीलेले असून गोव्यातील सर्व भागांची मला पूर्ण जाणीव आहे. पूर्वी गोव्यात सेवा बजावल्याने आता ‘मुरगाव पोर्ट अथोरेटी’ चे चेअरमन म्हणून मला त्याचा नक्कीच फायदा होणार असून मुरगाव बंदराच्या विकासाबरोबरच गोमंतकीयाच्या आणि समाजाच्या हीतासाठी विविध पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पोस्ट मास्टर जनरल’ म्हणून गोव्यात नियुक्त असताना मी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी संवाद साधलेला असून त्याचा मला भविष्यात फायदा होणार असल्याचे डॉ. एन विनोदकुमार म्हणाले.