पणजी : लुईस बर्जर कंपनीचा भारतातील प्रमुख जेम्स मॅकलंग व आणखी एक अधिकारी रिचर्ड हर्ष यांना गोव्यात आणण्याच्या प्रयत्नांना किती यश मिळते यावर लुईस बर्जर लाच प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे. या प्रकरणात गुन्हा अन्वेषणकडून (क्राईम ब्रँच) तपासाचा धडाका सुरू आहे. या विभागाने अनेक संशयितांना अटक करून त्यांचे जबाब नोंदविण्यातही यश मिळविले आहे. असे असले तरी या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या जेम्स आणि रिचर्ड यांना येथे आणण्याच्या प्रयत्नांवर खूप काही अवलंबून आहे. दोन्ही अधिकाऱ्यांपैकी महत्त्वाची भूमिका असलेला जेम्स यांना गोव्यात आणण्यासाठी क्राईम ब्रँचकडून प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी त्याच्या नावाने समन्स बजावले आहे. लुईस बर्जरच्या देशातील सर्व कार्यालयांत समन्स पोहोचविले आहे. विदेशातील कार्यालयातही पत्र पाठविले आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांना वॉरंट जारी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. (पान २ वर)
ते अधिकारी सापडणार?
By admin | Published: August 24, 2015 1:56 AM