शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

दसरा गेला, दिवाळीत भाव मिळेल का? स्थानिक झेंडू उत्पादक हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:35 AM

योग्य दर नसल्याने मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दसरा, दिवाळीला झेंडूच्या फुलांना मागणी असते. दसरा यंदा नुकसानीत गेला, आता दिवाळीला तरी या फुलांना चांगला दर मिळेल का? अशी अपेक्षा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सरकार, कृषी खाते शेतकऱ्यांना कृषीसाठी प्रोत्साहन देते. पण जेव्हा शेतकरी उत्पादन घेतो, तेव्हा त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी उत्पादन घेण्यास फार प्राधान्य देताना दिसत नाहीत.

मागील काही वर्षे झेंडूच्या फुलांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असल्याने यावर्षी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली. यंदा सुमारे १२५ मेट्रिक टन झेंडूच्या फुलांचे उत्पादन मिळणार, असा कृषी खात्याचा अंदाज होता. पण, दसऱ्याला स्थानिक झेंडू उत्पादकांना चांगला दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी भावच मिळाला नसल्याने झेंडूची फुले शेतात फेकण्याची वेळ आली आहे.

आवक वाढल्याने भाव नाही

कृषी खात्याने शेतकऱ्यांना ४ रुपयांना एक रोपटे दिले होते. तसेच अनुदानही दिले होते. यामुळे अनेक युवा शेतकऱ्यां पुढे येऊन आपल्या पडीक जमिनीवर झेंडूच्या फुलांची लागवड केली तसेच पावसाचा यंदा झेंडूच्या फुलांवर परिणाम जाणवला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले. पण, उत्पादनात वाढ झाल्याने दर मात्र घसरला. यावर्षीही परप्रांतीयांनी ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने झेंडूची फुले विकली. यामुळे स्थानिक झेंडू उत्पादकांना व शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला.

अपेक्षित भाव न मिळाल्याने झेंडू फुलांच्या लागवडीचे नुकसान झाले. कृषी खात्याकडून नुकसानभरपाई देण्याची अजून तरतूद नाही. शेतकऱ्यांना झेंडूची रोपटी लावण्यासाठी अनुदान दिले जाते. गोव्यातील बहुतांश शेतकऱ्यांची झेंडूची फुले अगोदर काही जणांकडून आरक्षित केली जातात. - नेव्हील आफान्सो, कृषी संचालक.

कृषी खात्याने कमी दरात रोपटी दिल्याने आम्ही आमच्या पडीक जमिनीवर झेंडूंच्या फुलांची लागवड केली होती. गेल्या वर्षी चांगला भाव मिळाला. पण, यावर्षी झेंडूची आवक खूप वाढल्याने चांगला दर मिळाला नाही तसेच परप्रांतीय झेंडू विक्रेत्यांनी कमी दरात फुले विकली. त्याचा फटका आम्हालाबसला. - बाबूसो गावकर, शेतकरी, धारबांदोडा.

 

टॅग्स :goaगोवा